Devendra Fadnavis : अशोक चव्हाणांची भेट घेतली नाही, केवळ गणपतीच्या दर्शनासाठी गेलो होतो; देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भारतीय नौसेनेची नवी निशाणी फडकवली आहे. स्वातंत्र्यांच्या 75 वर्षांतदेखील आपल्या नौसेनेच्या झेंड़्यावर इंग्रजांचे चिन्ह होते, गुलामीचे चिन्ह होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : अशोक चव्हाणांची भेट घेतली नाही, केवळ गणपतीच्या दर्शनासाठी गेलो होतो; देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image Credit source: tv9
| Updated on: Sep 02, 2022 | 4:42 PM

पुणे : माझी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याशी भेट झालेली नाही. गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने मी पोहोचलो आणि अशोक चव्हाण निघाले होते, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे. ते पुण्यात बोलत होते. चव्हाण आणि फडणवीस यांची भेट आशिष कुलकर्णी यांच्या घरी झाल्याची तसेच त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे, यावर फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारले असता, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या (Congress) मंत्र्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार का, असा प्रश्न विचारल्यावर मात्र फडणवीस यांनी मौन बाळगले. मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही, पुण्याची लोकसभाही लढवणार नाही. तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का, असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच या सर्व फक्त माध्यमातील चर्चा आहेत, असेही ते म्हणाले.

‘नवनवीन वादाचे विषय काढू नका’

पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद कशाला काढता असा सवाल करत जेव्हा करायचा आहे तेव्हा बघू. राज्य सरकारसमोर आज तरी कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो. मात्र आज कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे नाही. मुंबईची तिसरी महानगरपालिका करण्याचा देखील कुठलाही विचार आता नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका. आपल्याला विकासाकडे जायचे आहे. असे फडणवीस म्हणाले.

‘मराठी माणसासाठी आज अभिमानाचा दिवस’

अमित शाह गणपतीच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर एका शाळेच्या उद्घाटनाला जाणार आहेत. हा त्यांचा नियोजित दौरा आहे, असे अमित शाह आणि राज यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले. फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गायले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भारतीय नौसेनेची नवी निशाणी फडकवली आहे. स्वातंत्र्यांच्या 75 वर्षांतदेखील आपल्या नौसेनेच्या झेंड़्यावर इंग्रजांचे चिन्ह होते, गुलामीचे चिन्ह होते. तमाम भारतीय, मराठी माणसासाठी आज अभिमानाचा दिवस आहे. असे ते म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

‘चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सोलारवर कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू’

पुणे आणि पिंपरीतील आपण 150 बसेस आणि चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले. माननीय मोदीजींचे आभार मानतो त्यांनी सबसिडी दिली. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सोलारवर कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू, असे म्हणत आपल्याला विकासाकडे जायचे आहे, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.