meera borwankar | अजित पवार प्रकरणावरुन दोन अधिकारी आमनेसामने…अजित पवार यांच्या बचावासाठी…

| Updated on: Oct 16, 2023 | 11:17 AM

Meera Borwankar on Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार येरवडा येथील जमीन प्रकरणात अडचणीत आले आहे. पुणे येथील माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातून आलेल्या आरोपानंतर या प्रकरणात दोन अधिकारी आमनेसामने आले.

meera borwankar | अजित पवार प्रकरणावरुन दोन अधिकारी आमनेसामने...अजित पवार यांच्या बचावासाठी...
Meera Borwankar, dilip band and Ajit Pawar
Follow us on

पुणे | 16 ऑक्टोंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार 2010 मधील येरवडा येथील एका प्रकरणात अडचणीत आले आहेत. पुणे पोलिसांची येरवडा येथे असलेली तीन एकर जमिनी बिल्डरला देण्यासाठी दबाब आणल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. अजित पवार यांच्यावर हा आरोप तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला आहे. मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून हा आरोप केला आहे. या प्रकरणावरुन दोन अधिकारी आमनेसामने आले आहे. मीरा बोरवणकर यांच्या आरोपाला तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी उत्तर दिले आहे.

काय म्हणले दिलीप बंड

दिलीप बंड यांनी या प्रकरणात अजित पवार यांना क्लिन चीट दिली आहे. दिलीप बंड म्हणाले की, मी माजी विभागीय आयुक्त असताना येरवडा येथील जमिनीचा प्रस्ताव शासनाला दिला होता. एका बिल्डकरडून प्रस्ताव आला होता. त्यांच्याकडे आधीच येरवडा पोलीस स्टेशनच्या आसपासची जमीन होती. त्या जमिनीमध्ये पोलीस विभागाची जमीन येत होती. त्यामुळे त्याला ती जमीन हवी होती.

ती जमीन पोलीस विभागाची असल्यामुळे तक्तालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी याला मान्यता दिली होती. तेव्हा मीरा बोरवणकर आयुक्त म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला असता तर पोलिसांना घरे मिळाली असती. पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी ही बैठक घेतली असली तरी त्या जागेचा आणि अजित पवार यांचा काही संबंध नाही.

हे सुद्धा वाचा

मीरा बोरवणकर भूमिकेवर ठाम

दिलीप बंड यांनी अजित पवार यांना क्लिन चीट दिली असली तरी मीरा बोरवणकर आपल्या आरोपावर ठाम आहेत. त्या जमिनीचा लिलाव हा पोलीस कल्याणासाठी असल्याचे सांगने म्हणजे दिशाभूल करणे आहे. एका अर्थाने आपल्या आरोपाला यामुळे बळ मिळाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. येरवडा येथील ही सरकारी जमीन खासगी व्यक्तीला देण्यास आपण मान्यता दिली असती तर आपल्याकडे चुकीच्या नजरेने बघितले गेले असते. परंतु या प्रकरणात आपल्यावर दबाब आणला गेला, असे मीरा बोरवणकर यांनी म्हटले आहे.