भागवत कराडांचे मुंडे कुटुंबीयांशी संबंध कसे?, नेमकं काय म्हणाले कराड?; वाचा सविस्तर

| Updated on: Sep 05, 2021 | 1:53 PM

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्थमंत्री भागवत कराड यांनी आज नेवास येथे आले होते. यावेळी त्यांनी नेवासा तालुक्यातील देवगड येथे श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर मीडियाशी संवादही साधला. (dr. bhagwat karad reaction on relation with munde family)

भागवत कराडांचे मुंडे कुटुंबीयांशी संबंध कसे?, नेमकं काय म्हणाले कराड?; वाचा सविस्तर
bhagwat karad
Follow us on

नगर: केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मुंडे कुटुंबीयांशी असलेल्या संबंधावर भाष्य केलं आहे. मुंडे कुटुंबीयांसोबत माझे गेल्या 30 वर्षांपासूनचे संबंध आहेत. आमच्यात कुठलीही कटुता नाही, असं भागवत कराड यांनी स्पष्ट केलं आहे. (dr. bhagwat karad reaction on relation with munde family)

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्थमंत्री भागवत कराड यांनी आज नेवास येथे आले होते. यावेळी त्यांनी नेवासा तालुक्यातील देवगड येथे श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर मीडियाशी संवादही साधला. यावेळी त्यांनी मुंडे कुटुंबीयांसोबतच्या संबंधावर भाष्य केलं. मुंडे कुटूंबाशी माझे गेल्या तीस वर्षापासून संबंध आहेत. मुंडे वहिनी आणि गोपीनाथ गडाच्या आशीर्वादानंतरच मला मंत्रीपद मिळालं. त्यामुळे आमच्यात कुठलीही कटूता नाही, असं कराड यांनी सांगितलं.

जावेद अख्तर यांनी संघ समजून घ्यावा

यावेळी त्यांनी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या विधानाचा निषेध नोंदवला. जावेद अख्तर यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. अख्तर यांनी आरएसएसची तुलना तालिबानशी केली. अख्तर यांनी संघाला समजून घेण्याची गरज आहे. संघातील प्रत्येकजण राष्ट्रासाठी काम करतोय. संघातील कुणीही स्वार्थासाठी काम करत नाही, असं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांना टोला

यावेळी त्यांनी राज्यातील पूरस्थितीवरही प्रतिक्रिया दिली. राज्यात पूरस्थिती आहे. अनेक संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागतंय. मुख्यमंत्री मात्र घरात बसूनच कामकाज करताहेत, असा चिमटा त्यांनी काढला.

अख्तर काय म्हणाले होते?

दरम्यान, जावेद अख्तर यांनी दोन दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केलं होतं. आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट आहे. भारतीय संविधान त्याच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते या सीमा देखील ओलांडतील, असं जावेद अख्तर म्हणाले होते. राईट विंग जगात एक आहे. पूर्ण तालिबान बनण्याची ही एक प्रकारची पूर्ण ड्रेस रिहर्सल आहे. ते तालिबानी युक्तीचा अवलंब करत आहेत. ते एकच लोक आहेत, फक्त नाव वेगळे आहे, असंही ते म्हणाले होते.

आरएसएस आणि तालिबानमध्ये फरक कुठे आहे?

जावेद अख्तर म्हणाले, ‘मला वाटते जे आरएसएस, विहिंप, बजरंग दल यासारख्या संघटनांना समर्थन देतात, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तालिबान अर्थातच मध्ययुगीन मानसिकता आहेत, यात शंका नाही, ते रानटी आहेत पण तुम्ही समर्थन देत असलेल्यांपेक्षा ते वेगळे कुठे आहेत? त्यांची बाजू मजबूत होत आहे आणि ते त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहेत. त्यांची मानसिकता सारखीच आहे.’

भारतातील मुठभर मुस्लिम तालिबानचे चाहते

अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीच्या आगमनानंतर भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गाने व्यक्त केलेल्या आनंद आणि इस्तकबालावर जावेद अख्तर म्हणाले की, अशा लोकांची संख्या खूप कमी आहे. ते म्हणाले की हे फ्रिंज आहेत, बहुतेक भारतीय मुस्लिम अशा वक्तव्याने हैराण झाले आहेत. (dr. bhagwat karad reaction on relation with munde family)

 

संबंधित बातम्या:

‘त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना आत्मनिरीक्षणाची गरज’, गीतकार जावेद अख्तरांनी केली आरएसएसची तुलना तालिबानशी!

अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई, जरा धीर धरा, राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो; मुख्यमंत्र्यांनी फटकारले

शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो; राऊतांचं चंद्रकांतदादांना ओपन चॅलेंज

(dr. bhagwat karad reaction on relation with munde family)