शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो; राऊतांचं चंद्रकांतदादांना ओपन चॅलेंज

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असं ओपन चॅलेंज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे. (sanjay raut reply to chandrakant patil's statement over sharad pawar)

शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो; राऊतांचं चंद्रकांतदादांना ओपन चॅलेंज
sanjay raut
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 12:58 PM

पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असं ओपन चॅलेंज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा राऊतांना काय उत्तर देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (sanjay raut reply to chandrakant patil’s statement over sharad pawar)

संजय राऊत आज शिरुर-हवेली इथे आले होते. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राऊत यांनी थेट चंद्रकांत पाटील यांनाच ललकारले. चंद्रकांतदादा हरिश्चंद्राचे अवतार आहेत. आम्ही एकत्र काम केलंय. मी तर नेहमी आव्हान देतो शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असं सांगतानाच ही मराठ्यांची औलाद आहे. आम्ही समोरून वार करतो, असा टोला राऊत यांनी लगावला.

समोरून वार केल्यावर काय निघणार?

आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. पाठीमागून वार करत नाही. समोरून कोथळा काढतो, असं मी म्हटलं होतं. याचा त्यांना एवढा त्रास झाला की गुन्हा दाखल करा म्हणाले. समोरून वार केल्यावर काय निघणार? कोथळाच निघणार, असा टोला हाणतानाच चंद्रकांतदादांना महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आलेलं सहन होत नाही. जेवढे तुम्ही तडफडत राहणार. तेवढी तुमची शक्ती क्षीण होईल. आघाडीच्या नेत्यांनाही सांगणं आहे की, तुम्ही विरोधकासारखे वागू नका. मी आज वरिष्ठांशी बोलेन. ऐकलं तर बघू नाहीतर शिवसेनेच्या भाषेत सांगू, असं ते म्हणाले. कोण आला रे कोण आला, ही घोषणा भाजपात बघितली का? ती फक्त शिवसेनेतचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीला इशारा

सरकार आलं तरी प्रश्न तेच आहेत. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात. जेव्हा आमचं सरकार नव्हतं तेव्हा म्हणायचो आमचं सरकार आल्यावर बघू. मात्र आता बघयाची वेळ आलीये असं वाटतं, असा इशाराच त्यांनी राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे दिला. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालंय. मात्र स्थानिक पातळीवरील जे वतनदार असतात त्यांनी संयम ठेवावं. काही झालं तरी तुम्हाला आमच्या बरोबरच संसार करायचा आहे. भाजपासोबत सरकार होतं तेव्हा ही हेच होत होतं. त्यांनी आपलं ऐकलं नाही तर तुम्हीही मुख्यमंत्री आमचा आहे असं सांगा. सरकारमधली माणसं चांगली असतात. मात्र स्थानिक राजकारणाचा विषय येतो तेव्हा चढाया सुरू होता. आधीच्या सरकारमध्येही हाच त्रास होता. आपण एवढं ताकदवान व्हायला की पाहिजे पुढच्या वेळेला तो निवडून येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं ते म्हणाले.

तर जनआंदोलन उभारा

मविआचे नेते एकत्र बसल्यावर चर्चा करतात. मार्ग काढतात. स्थानिक विषयावर आम्ही चर्चा करतो. बैलगाडा शर्यत विषय मला वाटतं जुन्नर, मंचरपर्यंत आहे असं वाटलं. कोणी तरी सांगलीपर्यंत घेऊन गेलं. मात्र ते झालं नाही. बैलगाडा शर्यत सुरु झाल्याशिवाय मी उसंत घेणार नाही. जर सरकारकडून प्रश्न सुटणार नसेल तर जन आंदोलन उभं केलं पाहिजे. तामिळनाडूत लाखो लोक रस्त्यावर आले आणि प्रश्न सोडवला. महाराष्ट्रात शिवसेना पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकार असताना गुन्हे हे गंभीर

पाण्याच्या प्रश्नावर लढणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. जर सरकार आपलं असूनही गुन्हे दाखल होत असतील तर गंभीर आहे. तो विषय बघितला आहे. मी या विषयावर शरद पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांच्याशी बोलेन, असं त्यांनी सांगितलं.

जेवढं रेटाल तेवढी शिवसेना वर येईल

शिवसेना हा लाव्हा आहे. शिवसेना मागे हटणार नाही. आमचं बळ हे आमच्या मनात आणि मनगटात आहे. आज आमदार आहेत. उद्या असतील की नाही माहीत नाही. सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करा. शिवसेनेला जेवढं जास्त रेटाल तेवढी ती पुढे येईल. शिवसेनेवर जेव्हा वार झाले तेव्हा रक्ताच्या थेंबागणिक शिवसेना वाढत गेली. त्यामुळे शिवसैनिकांसारखे वागा. लोकांना एकत्रित घेऊन काम करा. बाळासाहेबांचा जो मंत्र आहे 80 टक्के समाजकारण आणि 20 राजकारण ते करा, असं आवाहनही त्यांनी केलं. (sanjay raut reply to chandrakant patil’s statement over sharad pawar)

संबंधित बातम्या:

दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, सरकारलाच आता निवडणुका नकोय; राज ठाकरेंचा हल्लाबोल

तुमच्या कार्यक्रमांना गर्दी चालते, फक्त गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत?; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

तुमच्या हातात असेल तर आताच अटक करा; संजय राऊतांचं चंद्रकांतदादांना आव्हान

(sanjay raut reply to chandrakant patil’s statement over sharad pawar)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.