AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या कार्यक्रमांना गर्दी चालते, फक्त गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत?; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज पुण्यात आले आहेत. पुण्यातील आठ मतदारसंघातील पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांशी संवाद साधण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. (raj thackeray attacks maha vikas aghadi over ganesh festival)

तुमच्या कार्यक्रमांना गर्दी चालते, फक्त गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत?; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
raj thackeray
| Edited By: | Updated on: Sep 05, 2021 | 11:39 AM
Share

पुणे: तुमच्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडी सरकारला केला आहे. (raj thackeray attacks maha vikas aghadi over ganesh festival)

पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज पुण्यात आले आहेत. पुण्यातील आठ मतदारसंघातील पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांशी संवाद साधण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा सवाल केला. सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिकडे गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवाला गर्दी चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा. तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार. फक्त गणेशोत्सवाला नको. ही कोणती पद्धत?, असा सवाल करतानाच गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे मंडळं ठरवतील. गणेशोत्सव मंडळांशी बोलून चर्चा करू, असं राज म्हणाले.

ओबीसींचा मुद्दा पुढे करून काय साधायचे आहे?

यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येणार असल्याच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष्ट केली. निवडणुका स्थगित ठेवल्या पाहिजे. पण काम पटकन होणार असेल तर स्थगिती मान्य आहे. सरकारच्या फायद्याचं असेल म्हणून आता निवडणुका घेतल्या जात नसतील. यात काही काळंबेरं असेल तर तेही समजून घ्यायला पाहिजे. सरकारलाच या निवडणुका नको आहेत आता. कारण नंतर सरकारच महापालिका चालवणार. कारण त्यावर प्रशासक नेमणार आणि सरकारच सर्व काम बघणार. हे सर्व उद्योगधंदे सरकारचे चालू आहेत. नुसता ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही साध्य करतेय असं नको. पण जनगणना वगैरे झाल्यावर निवडणुका घ्यायला काही हरकत नाही, असं राज म्हणाले. सरकारकडे यंत्रणा आहे. त्यामुळे मनात आणलं इम्पिरिकल डेटा किंवा जनगणना हे सर्व होऊ शकतं. ती काही कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

कोरोनाची भीती दाखवली जातेय

या लॉकडाऊनमुळे जे चाललं ते बरं चाललं असं सर्व सरकारला वाटतंय. आंदोलने नाही, मोर्चे नाही, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, रस्त्यावर कुणी उतरायचे नाही. काही झंझटच नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकाने चालवा. बरं चाललंय सरकारांचं. केवळ कोरोनाची भीती दाखवली जात आहे. तिसरी चौथ्या लाटेची भीती दाखवली जात आहे. भीती दाखवून सरकार सर्व करत असेल तर हे कुठपर्यंत चालणार?, असा सवालही त्यांनी केला.

तरच शाळा सुरू करा

यावेळी त्यांनी शाळा सुरू करण्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुलांचं लसीकरण झालं नाही. पुनावालांचंही स्टेटमेंट आहे. पण लसीकरण पूर्ण झालं नसेल तर शाळा कशा उघडणार? लसीकरण झाल्यावरच शाळा उघडा, असंही ते म्हणाले. (raj thackeray attacks maha vikas aghadi over ganesh festival)

संबंधित बातम्या:

दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, सरकारलाच आता निवडणुका नकोय; राज ठाकरेंचा हल्लाबोल

तुमच्या हातात असेल तर आताच अटक करा; संजय राऊतांचं चंद्रकांतदादांना आव्हान

बीएसयूपीच्या घरांचे ताबापत्र देऊनही प्रत्यक्ष ताबा नाकारला; दिव्यांगांचे बुधवारी ठाण्यात कायदेभंग आंदोलन

(raj thackeray attacks maha vikas aghadi over ganesh festival)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.