बीएसयूपीच्या घरांचे ताबापत्र देऊनही प्रत्यक्ष ताबा नाकारला; दिव्यांगांचे बुधवारी ठाण्यात कायदेभंग आंदोलन

ठाणे महापालिकेने दीड वर्षांपूर्वी सोडत काढून पात्र दिव्यांगांना बीएसयूपीची घरे देण्यासाठी ताबापत्र दिली. मात्र, दीड वर्षे उलटले तरी दिव्यांगांना या घरांचा प्रत्यक्ष ताबा अद्यापही देण्यात आलेला नाही. (Homeless specially abled people will agitation in thane for bsup houses)

बीएसयूपीच्या घरांचे ताबापत्र देऊनही प्रत्यक्ष ताबा नाकारला; दिव्यांगांचे बुधवारी ठाण्यात कायदेभंग आंदोलन
Thane Municipal Corporation

ठाणे: ठाणे महापालिकेने दीड वर्षांपूर्वी सोडत काढून पात्र दिव्यांगांना बीएसयूपीची घरे देण्यासाठी ताबापत्र दिली. मात्र, दीड वर्षे उलटले तरी दिव्यांगांना या घरांचा प्रत्यक्ष ताबा अद्यापही देण्यात आलेला नाही. घरांचा ताबा मिळावा, यासाठी दिव्यांगांनी आंदोलन करूनही कार्यवाही होत नसल्याने दिव्यांगांचा संताप अनावर झाला आहे. त्यामुळे येत्या बुधवारी 8 सप्टेंबर रोजी बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना संचालित अखिल भारतीय दिव्यांग सेना ठामपा मुख्यालयात घुसून कायदेभंग आंदोलन करणार आहे, अशी माहिती संघटनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद युसूफ खान यांनी दिली. (Homeless specially abled people will agitation in thane for bsup houses)

दिव्यांगांना बीएसयूपी योजनेतून परवडणारी घरे देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जांमधून 4 फेब्रुवारी 2020 रोजी पात्र- अपात्र निश्चित करून 6 फेब्रुवारी 2020 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दिव्यांगांना चाव्या देण्याचा सोपस्कार पार पाडण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर सुमारे दीड वर्षांनंतरही काही अपवाद वगळता बहुतांश दिव्यांगांना घरांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, या घरांचा ताबा घेण्यासाठी अनेक दिव्यांगांनी आपल्या भाडेतत्त्वावरील घरांची अनामत रक्कम घेऊन पालिकेत जमादेखील केली आहे. मात्र, बीएसयूपी कक्ष स्थावर मालमत्ता विभागाकडे तर स्थावर मालमत्ता विभाग बीएसयूपी कक्षाकडे जबाबदारी ढकलत आहे.

भरपावसात आंदोलन करूनही फायदा नाही

माहिती अधिकारातही दिवा, तुळशीधाम, कासारवडवली, ब्रम्हांड, रिव्हरवूड येथील घरांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. या घरांचा ताबा मिळावा, यासाठी 12 जुलै रोजी दिव्यांगांनी पालिका मुख्यालयासमोर भर पावसात धरणे आंदोलनही केले होते. त्यावेळेस हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दीड महिन्यात दिव्यांगांना घरांचा ताबा देण्यात आलेला नाही. त्यामुळेच येत्या बुधवारी सर्व दिव्यांग पालिका मुख्यालयात घुसून कायदेभंग आंदोलन करणार आहेत, असे युसूफ खान यांनी सांगितले.

आंदोलनात सहभागी व्हा

दरम्यान, ज्या दिव्यांगांना ताबा पत्र मिळूनही प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळालेला नाही, अशा दिव्यांगांनी अखिल भारतीय दिव्यांग सेनेशी +91 99878 22946 या क्रमांकावर संपर्क साधून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही खान यांनी केले आहे. (Homeless specially abled people will agitation in thane for bsup houses)

 

संबंधित बातम्या:

भाजप सरकारने मंजूर केलेल्या कामांचं ठाकरे सरकारकडून उद्घाटन, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचा निशाणा

VIDEO: ‘अचानक गाय खाली पडते आणि अवघ्या 2 मिनिटात मृत्यू’, भिवंडीत शेतकऱ्याच्या 15 गायींच्या मृत्यूनं खळबळ

पुढच्या वर्षीपासून मध्य रेल्वेवरील प्रवास होणार अधिक सुस्साट; पाचव्या आणि सहाव्या लेनचे काम अंतिम टप्प्यात

(Homeless specially abled people will agitation in thane for bsup houses)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI