Pune Metro Extension : रामवाडी ते वाघोली, वनाज ते चांदनी चौक मेट्रो विस्तार, पुढच्या महिन्यात बैठक?

पुणे मेट्रोच्या रामवाडी ते वनाज आणि रामवाडी ते वाघोली असा विस्तार करण्याची योजना आखली आहे. या योजनेला केंद्र सरकार लवकरच यास मंजूरी देण्याची शक्यता आहे. एकदा मंजूरी मिळाली की लागलीच मेट्रो मार्ग उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

Pune Metro Extension : रामवाडी ते वाघोली, वनाज ते चांदनी चौक मेट्रो विस्तार, पुढच्या महिन्यात बैठक?
pune metro
| Updated on: Aug 13, 2024 | 9:03 PM

Pune Metro Extension : पुण्यातील मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मेट्रोचा विस्ताराची योजना आहे. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली ( विठ्ठलवाडी ) असा हा विस्तार करण्याची योजना आहे. केंद्र सरकारकडे या विस्तारासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पुढील महिन्यात केंद्र सरकारच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाची ( पीआयबी ) बैठक आहे. या बैठकीत या प्रकल्पाचे सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर या योजनेला अंतिम स्वरुप मिळणार आहे.

पुण्यात वनाज ते रामवाडी हा 16 किमीचा मेट्रो मार्ग सुरु झालेला आहे. या मार्गावरील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे सहा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. याच मार्गांवर विस्तारित मार्गाला राज्य सरकारने मंजूरी दिलेली आहे. या योजनेचा खर्च तीन हजार 756 कोटी 58 लाख रुपये आहे. केंद्र आणि राज्य सरकार आणि भांडवली बाजारातून यासाठी कर्ज उभारण्याची योजना असल्याचे मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ( महा-मेट्रो ) म्हटले आहे.

वनाज ते चांदनी चौक मार्गावर दोन स्थानके असणार आहेत. तर रामवाडी ते वाघोली अशा विस्तारित एलिवेटेड मार्गावर एकूण 11 एलिवेटेड स्थानके बांधण्यात येणार आहे. या संदर्भात विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्यात येणार आहे. या दोन्ही योजनांना राज्य सरकारने 11 मार्च 2024 रोजी मंजूरी दिली होती. वनाज ते चांदनी चौक असा 1.12 किमी लांबीचा मार्ग विस्तार आहे, हा संपूर्ण उन्नत मार्ग असणार आहे. यात दोन कोथरुड बस डिपो आणि चांदनी चौक अशी दोन स्थानके असणार आहेत.

मेट्रो स्थानकांच्या बांधकामासाठी कन्सटंट नियुक्त करण्यासाठी 7 ऑगस्ट 2024 रोजी महा-मेट्रोने निविदा मागविल्या आहेत. यात रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदनी चौक अशा विस्तारासह एलिवेटेड मार्गासाठी खांबांचे  आणि स्थानाकांच्या  डिझाईनचा देखील समावेश आहे. रामवाडी ते वाघोली मार्गाचा विस्तार 11.36 किमी लांबीचा आहे. यात विमान नगर, खराड़ी बायपास आणि वाघोली सह 11 स्थानकांचा समावेश आहे. एकूण , विस्तारात 13 स्थानकांसह 12.75 किमी क्षेत्राला कव्हर करणार आहे. या योजनेसाठी एकूण 3,756.58 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

अहमदनगर रोडच्या रहिवाशांना होणार फायदा

वनाज ते चांदणी चौक मार्गाचा विस्तार आवश्यक असून तो नैसर्गिक आहे. या योजनेमुळे अहमदनगर रोडच्या रहिवाशांना लाभ होणार आहे. आणि त्यामुळे आयटी कंपन्या, वित्तीय आणि शैक्षणिक संस्थामध्ये जाणाऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती महा-मेट्रो संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले.

पीआयबीची बैठक पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता

या मेट्रो मार्गांच्या विस्ताराला केंद्र सरकारकडू मंजूरी मिळताच आम्ही काम सुरु करण्याची संपूर्ण तयारी करीत आहोत. पुढच्याच महिन्यात पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाची ( पीआयबी) ची बैठक होण्याची शक्यता असल्याचे महा-मेट्रो संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले.