Pune : घटस्फोट असाही! पतीचा मानसिक छळ केला, आता कौटुंबिक न्यायालयानं दिला पोटगीचा आदेश; वय माहितीय?

| Updated on: Jun 26, 2022 | 5:12 PM

याचिकाकर्ता एका शैक्षणिक संस्थेचा संचालक आहे. आपल्याला पत्नीकडून सतत त्रास आणि मानसिक छळ सहन करावा लागत आहे, असा याचिकाकर्त्याचा दावा होता. महिला याच शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी आहे.

Pune : घटस्फोट असाही! पतीचा मानसिक छळ केला, आता कौटुंबिक न्यायालयानं दिला पोटगीचा आदेश; वय माहितीय?
सुशिक्षित महिला विभक्त पतीकडे पोटगी मागू शकत नाही
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : एका 83 वर्षीय वृद्धाला आपल्या पत्नीकडून पोटगी (Alimony) मिळणार आहे. कौटुंबिक न्यायालयाने हे आदेश दिले आहे. तब्बल चार वर्षांच्या खटल्यानंतर, पुण्यातील एका कौटुंबिक न्यायालयाने (Family Court) हा आदेश दिला आहे. एका 78 वर्षीय महिलेला तिच्या 83 वर्षीय पतीला मासिक पोटगी 25 हजार रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचा कायमचा स्रोत नाही. या जोडप्याने 1964मध्ये लग्न केले होते. तर पतीने 2018मध्ये घटस्फोटासाठी अर्ज (Application for divorce) केला होता. त्याचा निकाल कौटुंबिक न्यायालयाने लावला असून 78 वर्षीय पत्नीला दणका दिला आहे. वयाच्या 83व्या वर्षात असणाऱ्या आपल्या पतीला पोटगी द्यावीच लागणार आहे. शुक्रवारी कौटुंबिक न्यायालयात यावर सुनावणी झाली. त्यानुसार आता ही पोटगी द्यावी लागणार आहे.

मुलींचे झाले लग्न

पत्नीविरोधात तक्रार दाखल करून घटस्फोट घेणारा पती म्हणजेच याचिकाकर्ता हा एका उच्च पदावर आहे. घटस्फोट आणि पोटगीची मागणी त्याने याचिकेत केली होती. हा याचिकाकर्ता एका शैक्षणिक संस्थेचा संचालक आहे. आपल्याला पत्नीकडून सतत त्रास आणि मानसिक छळ सहन करावा लागत आहे, असा याचिकाकर्त्याचा दावा होता. महिला याच शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी आहे. त्यांना दोन मुली असून त्यांचे लग्न झाले आहे.

घरी जेवायला केली मनाई?

याचिकाकर्त्याने दावा केला आहे, की त्याला त्याच्या पत्नीकडून संस्था आणि घर सोडण्यासाठी सतत त्रास दिला जात होता. महिलेला आजार झाला तेव्हा याचिकाकर्त्याने तिची चांगली काळजी घेतली. ती बरी होताच तिने त्याला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. या व्यक्तीला मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास आहे, त्यामुळे त्याच्या तब्येतीची चांगली काळजी घेण्याचा आणि योग्य आहार घेण्याचा आणि वेळेवर औषध खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्या व्यक्तीचा असाही दावा आहे, की त्याच्या पत्नीने त्याला घरी जेवायला मनाई केली होती. शेवटी तिच्या छळाला कंटाळून याचिकाकर्त्याने 2018मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला.

हे सुद्धा वाचा

हिंदू विवाह कायद्यानुसार मागू शकतो पोटगी

न्यायाधीश राघवेंद्र आराध्ये यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. जर पतीकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसेल आणि पत्नी कमावती असेल आणि त्यांच्यात सतत कौटुंबिक वाद सुरू असतील तर पती हिंदू विवाह कायदा, 1955च्या कलम 24 अंतर्गत पोटगीसाठी दावा दाखल करू शकतो, असे याचिकाकर्त्याच्या वकीलवकील वैशाली चांदणे यांनी सांगितले.