पुण्यात मोठी दुर्घटना, होर्डिंग कोसळल्याने हाहाकार, 4 ते 5 जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या रावेर येथे मोठी दुर्घटना घडली आहे. रावेरमध्ये वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यात मोठी दुर्घटना, होर्डिंग कोसळल्याने हाहाकार, 4 ते 5 जणांचा मृत्यू
pune hording collapsed
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 7:57 PM

पुणे : पिंपरी-चिंचवड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या रावेर येथे मोठी दुर्घटना घडली आहे. रावेरमध्ये वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळल्यामुळे होर्डिंग कोसळले. यावेळी होर्डिंगखाली आठ जण अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.

विशेष म्हणजे पुण्यात होर्डिंग कोसळून मृत्यू होण्याची ही पहिली घटना नाही. याआधीदेखील पुण्यात रसत्यावर होर्डिंग कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज पुन्हा होर्डिंग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रावेरमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच होर्डिंगमुळे कोसळल्याची घटना समोर आल्याने सर्वसामान्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

पिंपरी चिंचवडमध्ये आज संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पिंपरी चिंचवड शहरात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडली. तर वाऱ्यामुळे गाड्या पडल्याचं चित्र दिसत होतं. रावेत भागात रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. शहरात रस्त्यांवर लावण्यात आलेले बॅनर टराटरा फाटले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे स्टँडवर लावलेल्या गाड्या जमिनीवर पडल्या.

हे सुद्धा वाचा

पाऊस आणि वादळी वाऱ्याने रौद्र रुप धारण केलं. त्यातून रावेर येथे मोठं होर्डिंग थेट जमिनीवर कोसळलं. यावेळी सात ते आठ जण होर्डिंग खाली कोसळल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तसेच स्थानिकांकडून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु झाले.

संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने इतर प्रशासनाला याबाबतव माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी तातडीने क्रेन मागवण्यात आलं. क्रेनच्या मार्फत कोसळलेलं होर्डिंगचे भाग बाजूला सारण्याचं काम सुरु झालं आणि अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने चार ते पाच रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावण्यात आल्या. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण या दुर्घटनेत आतापर्यंत चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण रावेर परिसर हादरला आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.