
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात त्याला मुन्ना पोळेकर याने ट्रॅप लावत आपल्या साथीदारांसह मोहोळला संपवलं. या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
माझा सरकार आणि प्रशासनावर विश्वास आहे. माझे पती हिंदुत्त्ववादाचं काम करत होते म्हणून ही घटना झाली आहे. ज्यांना वाटत आहे की त्यांचं असं करून मी खचून जाईल. त्यांना माझं एकच सांगणं आहे, मी हिंदुत्त्वावाद्याची बायको आहे. माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघिण आहे. हिंदुत्त्ववादासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार असल्याचं स्वाती मोहोळ यांनी म्हटलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी स्वाती मोहोळ यांची राहत्या घरी जात भेट घेतली.
स्वाती मोहोळ या भाजपतच्या महिला पदाधिकारी आहेत. 2022 साली स्वाती मोहोळ यांनी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजप नेते जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत न्याय देण्याची मागणी केली.
राजकीय चर्चा करायला आलो नाही. मोहोळ कुंटुंबाने आपलं हिंदुत्त्ववादी काम सुरू ठेवायला हवं. ताईंनी ताकदीने आपलं काम पुढे घेऊन जावं. हिंदु समाजावर संकट आलं की शरद मोहोळ उभे राहिले आहेत. मीडियामधील काहींनी त्यांची चुकीचा प्रयत्न पसरवण्याचा प्रयत्न करू नये. त्याबद्दल मोहोळ कुटुंबियांची नाराजी आहे. ते गुन्हेगारी क्षेत्रात कसे आले आणि का आले याची कोणालाच माहिती नाही. त्यामुळे चुकीचा प्रतिमा तयार करणं थांबवावं, नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 ला दिवसाढवळ्या दीड वाजता हत्या करण्या आली होती. या हत्या प्रकरणात साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर(वय 20, रा. सुतारदरा, कोथरुड), विठ्ठल किसन गडले (वय 34, रा. सुतारदरा, कोथरुड), अमित मारुती कानगुडे (वय 24, रा. धायरी), नामदेव महिपत कानगुडे (35, रा. भूगाव), चंद्रकांत शाहु शेळके (वय 22, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष घवाळकर (वय 20, रा. कोथरुड), रवींद्र वसंतराव पवार (वय 40) आणि संजय रामभाऊ उउ्डाण (वय 45, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड) अटकेत आहेत.