विनायक मेटे भाजपचेच, गुणरत्न सदावर्तेंचं भाजपशी कनेक्शन आहे काय?; हसन मुश्रीफ यांची टोलेबाजी

| Updated on: Jun 05, 2021 | 10:25 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यावर टीका केली आहे. (hasan mushrif slams vinayak mete and gunratna sadavarte)

विनायक मेटे भाजपचेच, गुणरत्न सदावर्तेंचं भाजपशी कनेक्शन आहे काय?; हसन मुश्रीफ यांची टोलेबाजी
हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडणार?
Follow us on

नगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यावर टीका केली आहे. मेटे हे भाजपचेच आहेत. त्यामुळे त्यांची भावना रास्त आहे, असा चिमटा काढतानाच शिवस्वराज्य दिनी सरकारी कार्यालयांवर भगवा फडकवला तर बिघडले कुठे? अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा त्याला विरोध का? सदावर्ते यांचं भाजपशी काही कनेक्शन आहे का? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे. (hasan mushrif slams vinayak mete and gunratna sadavarte)

हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. शिवस्वराज्य दिनानिमित्त सरकारी कार्यालयांवर भगवा झेंडा फडकवण्याची घोषणा मुश्रीफ यांनी केली आहे. त्याला अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. त्यावरून मुश्रीफ यांनी सदावर्ते यांच्यावर टीका केली. सदावर्ते यांना नेमकी अडचण काय आहे? मराठा आरक्षणाच्या वेळी देखील त्यांनी असाच विरोध केला होता. त्यामुळे त्यांचे भारतीय जनता पक्षासोबत कनेक्शन आहे की काय असा वास येतो, असं मुश्रीफ म्हणाले.

आरक्षणाबाबत मोदींशी बोललं पाहिजे

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी बीडमध्ये मोर्चा काढला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मेटे यांनी भव्य मोर्चा काढला. मात्र आरक्षण देण्याबाबत राज्याला अधिकार राहिलेला नसून सुप्रीम कोर्टाचा निकाल स्पष्ट आहे, असं ते म्हणाले. विरोधकांनी मराठा आरक्षणवरून राजकारण न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा करायला पाहिजे. इतकेच नाही तर केंद्रीय मागासवर्गीय आयोग मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी येऊन त्यांना एकत्रितपणे भेटलं पाहिजे, असं ते म्हणाले. विनायक मेटे हे भाजपचे असल्याने त्यांच्या भावना रस्ता आहे, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली.

नगर जिल्हा सोमवारपासून अनलॉक

यावेळी त्यांनी सोमवारपासून नगर जिल्हा पूर्णपणे अनलॉक होणार असल्याची घोषणा केली. शासनाच्या निकषानुसार अहमदनगर जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यात समावेश होतो. त्यामुळे सोमवारपासून अहमदनगर जिल्हा पूर्णपणे अनलॉक होणार आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4.30% इतका आहे. राज्याच्या निकषानुसार हा रेट 5 % पेक्षा कमी असल्याने अहमदनगर जिल्हा पहिल्या टप्प्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. (hasan mushrif slams vinayak mete and gunratna sadavarte)

 

संबंधित बातम्या:

‘शिवराज्याभिषेक दिन’ प्रत्येक महाविद्यालयात ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार, पुढील वर्षीपासून ‘शिवज्योत रॅली’

Nashik Unlock | नाशिकमध्ये आता सर्व दुकाने 4 वाजेपर्यंत सुरु राहणार, शनिवार-रविवार पूर्णपणे बंद, नवे नियम नेमके काय?

अशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही: चंद्रकांत पाटील

(hasan mushrif slams vinayak mete and gunratna sadavarte)