मासिक पाळीतील रक्त विकण्यापासून हाडांचा चुरा खाऊ घालण्यापर्यंत, या पाच घटना वाचून तुम्हाला मोठा धक्का बसेल

| Updated on: Mar 14, 2023 | 12:58 PM

महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013 हा कायदा आहे. त्यानंतर महिलांवर अंधश्रद्धेतून अत्याचार होत आहे.

मासिक पाळीतील रक्त विकण्यापासून हाडांचा चुरा खाऊ घालण्यापर्यंत, या पाच घटना वाचून तुम्हाला मोठा धक्का बसेल
women
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

पुणे : सासरच्या लोकांनी मासिक पाळीतील रक्त विकण्यासाठी पुण्यातील एका महिलेचा छळ केल्याचा अघोरी प्रकार उघड झाला. या प्रकारानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. राज्यभरात या घटनेची चर्चा सुरु आहे. महिलांसदर्भात देशात कसा अंधविश्वास जोपासला जात आहे, त्याचे उदाहरण देणाऱ्या या पाच घटना डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत आणि २१ व्या शतकात महिलांना कशी वागणूक दिला जाते, ते कटू सत्य समोर आणणाऱ्या आहेत. आधी पुण्यातील विवाहित महिलेसंदर्भात काय झाले ते पाहूया

मासिकपाळीचे रक्त विकले

बीड सासर असलेल्या पुण्यातील महिलेसंदर्भातील हा प्रकार घडला आहे. सासू आणि दिराने २७ वर्षीय महिलेसंदर्भात केलेल्या या प्रकारानंतर राज्यातील सर्वच सुज्ञ लोकांना धक्का बसला. सासरच्या एकूण सात जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित महिला मागील दोन-अडीच वर्षांपासून पोलीस स्टेशनचे हेलपाटे घालत होती. अनेकदा हेलपाटे मारूनही पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेत नव्हती, असा दावा तिने केला. त्या महिलेच्या मासिक पाळीचे रक्त कापसाने टिपून एका बाटलीत जमा केलं आणि मांत्रिकाला 50 हजारांना विकले, असे महिलेने विश्रांतवाडी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी जादूटोणा कायद्यांतंर्गंत पुण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर हे प्रकरण बीड पोलिसांकडे वर्ग केले आहे. तसेच राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

मुलगा होण्यासाठी खाऊ घातला हाडांचा चुरा


पुणे येथील महिलेचे २०१९ मध्ये लग्न झाले होते. सासरच्या मंडळींनी मुले होण्यासाठी तिच्यावर काळा जादूचा प्रयोग सुरु केले. तिला मांत्रिकाकडे नेण्यात आले. आमवश्याला तिला मृत व्यक्तीच्या हाडांचा चुरा पाण्यात घालून खाऊ घातला गेला. त्यानंतर धबधब्या खाली आंघोळ करण्याचे सांगण्यात आले.

महिला चिमट्याने चटके दिले


उत्तर प्रदेशात अंधश्रद्धेतून महिलेला चटके दिल्याचा प्रकार उघड झाला. संगीता तिवारीचे लग्न शिवम शुक्लशी १५ फेब्रवारी रोजी झाले होते. अंधश्रद्धेतून २२ फेब्रुवारी रोजी तिला मांत्रिकाकडे नेले. तिच्या हातांना गरम चिमट्याने चटके दिले गेले. त्यानंतर संगीताने आपल्या वडिलांना फोन केला आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पत्नी आणि मुलांवर चाकूने वार


राजकोटमध्ये नेपाळी परिवारातील ही घटना आहे. एका सुरक्षा रक्षकाने आपल्या पत्नी, मुलगा अन् मुलीवर चाकूने वार केले. त्यात मुलीचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या पत्नी आणि मुलास रुग्णालयात भरती करण्यात आले. मुलाने पोलिसांना सांगितले की अंधविश्वासामुळे वडिलांनी मला आणि माझ्या बहिणीला मारुन टाकण्याचे आईला सांगितले. त्यानंतर आईने नकार दिल्यावर तिघांवर चाकूने वार केले.

बागेश्वर धाममध्ये महिलेचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील ३३ वर्षीय नीलम उर्फ निलू आपल्या पती देवेंद्रसिंह सोबत बागेश्वर धाममध्ये आली होती. तिला किडनीचा आजार होता.ती महिला बोगेश्वर धाममध्ये बाबांना भेटण्यासाठी रांगेत उभी राहिली. त्याचवेळी महिलेचा मृत्यू झाल्याचं झाला. जवळपास महिनाभर महिला पतीसोबत बागेश्वर धाममध्ये वास्तव्यास होती. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेली महिला उपचारासाठी बागेश्वर धाममध्ये नेले होते.

“महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013”,हा एक क्रांतिकारी कायदा आहे. देशातही अंधश्रद्धेसंदर्भात Anti-Superstition and Black Magic Act, 2013 लागू आहे. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घडलेल्या घटना समोर आहेत.