AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : मान्सून कुठे आला, राज्यात मान्सून कधी येणार?, काय आहे IMD चा अंदाज

Monsoon and weather Update : भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भात अपडेट माहिती दिली आहे. मान्सूनची प्रगती कुठपर्यंत आलीय अन् त्यानंतर राज्यात मान्सून कधी पोहचणार? हे हवामान विभागाने सांगितलंय.

Monsoon Update : मान्सून कुठे आला, राज्यात मान्सून कधी येणार?, काय आहे IMD चा अंदाज
| Updated on: May 25, 2023 | 10:29 AM
Share

पुणे : मे महिन्यात तापमान सर्वत्र वाढले. राज्यातील अनेक जिल्ह्याच्या तापमानाने ४० अंशांचा वर पारा गाठला आहे. अनेक ठिकाणी कुठे हिट व्हेवचा ईशारा दिला आहे. त्याचवेळी राज्यात विदर्भात अवकाळ पाऊस आला आहे. उन्हामुळे जंगलातील वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. यामुळे आता मान्सून कधी येणार? याची वाट सर्वच जणांकडून पाहिली जात आहे. यासंदर्भात महत्वाची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

कुठे आहे मान्सून

मान्सून अंदमान-निकोबार बेटावरच रेंगाळला आहे. त्याचा वेगही मंदावला होता. सध्या नैऋत्य वाऱ्यांना गती नसून मौसमी वारे दक्षिण अंदमानच्या समुद्रातच आहे. पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

चार दिवस उशीर होणार

विषुववृत्तीय अक्षांशांमध्ये दक्षिण हिंद महासागरावर चक्रीवादळ सरकत आहे. हे वादळ कमी होण्यास जवळपास एक आठवडा लागेल. हे वादळ मान्सूनला रोखणारे आहे. परंतु सध्या मान्सून अंदमान निकोबारकडे वेगाने वाटचाल करत आहे.  मान्सूनचे आगमन चार दिवस उशीराने होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. केरळमध्ये 1 जून रोजी दाखल होणारा मान्सून आता 4 जून रोजी दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईत मान्सून 11 ते 12 जून दरम्यान येण्याची शक्यता आहे.

स्कायमेट अन् आयएमडीचा वेगवेगळा अंदाज

स्कायमेटकडून यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून यंदाचा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाचा मे अखेरपर्यंत आणखी एक अंदाज येणार आहे. त्यात यंदाच्या पावसाची परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

मे महिन्यात धरणाचा साठा वाढला

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील विदर्भात मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. यामुळे अमरावती जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. परिणामी हतनूर धरणाच्या जलसाठ्यात गेल्या चार दिवसांत ३.२५ दलघमी वाढ झाली. हतनूरच्या इतिहासात पहिल्यांदा मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात जलसाठा घटण्याऐवजी सलग दोन वेळा वाढ झाली. यामुळे पाऊस लांबला तरी धरणातून पाणीपुरवठा अवलंबून असलेली ११० गावे, शहरे व औद्योगिक प्रकल्पांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजेच पंधरा दिवस जास्तीचा दिलासा मिळेल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.