
आयएएस, आयपीएस, आयएफएस या परीक्षांचे आकर्षण देशभरातील तरुणांना असते. त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करुन यश मिळवता येते. चतुरस्रा व्यक्तिमत्त्वाचा विकास करुन या परीक्षेतील यशाला गवसनी घालता येते. सध्या अहमदनगर जिल्ह्यातील असलेली आयएएस डॉक्टर पूजा खेडकर चर्चेत आल्या आहेत. पूजा खेडकर यांची चर्चा त्यांच्या कामगिरीमुळे होत नाही तर त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या कारनाम्यांमुळे त्या बातम्यांच्या विषय बनल्या आहेत. काय आहे पूजा खेडकर प्रकरण? त्यांच्या मागण्या काय होत्या? त्यांना ते अधिकार होते का? आयएएसची मॉर्क मुलाखत का झाली व्हायरल? आयएएससाठी दिलेल्या प्रमाणपत्रांवर का निर्माण झाला संशय? या प्रकरणात पुढे काय होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या… पूजा खेडकर यांना यूपीएससीमध्ये किती गुण मिळाले अहमदनगर जिल्ह्यातीतील पाथर्डीमधील भालगाव येथील पूजा खे़डकर कुटंबीय आहेत. त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. ते शासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या आई मनोरमा खेडकर शेतकऱ्यांना बंदूक...