AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivjayanti 2023 : शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

आज सकाळी ८ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रीच्या १२ वाजेपर्यंत वाहनांची होणारी गर्दी पाहता आदेश जारी करण्यात आले आहेत.

Shivjayanti 2023 : शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
वाहतुकीत बदलImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 18, 2023 | 12:31 PM
Share

पुणे – राज्यात शिवजयंती (Shivjayanti 2023) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्या अनुशंगाने महाराष्ट्रातील (MAHARASHTRA) महत्त्वाच्या शहरात गर्दी पाहायला मिळते. लोकांना कुंचबना होऊ नये, यासाठी पोलिस (PUNE POLICE) वाहतूकीत बदल करतात. त्याचबरोबर शिवजयंतीला अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. त्याबरोबर महत्त्वाच्या शहरात जाहीर सभांचं सुध्दा आयोजन करण्यात येत. तरुण मंडळी मिरवणुकीत अधिक व्यस्त असल्याची पाहायला मिळते. पुण्यात प्रत्येकवर्षी गर्दी होत असल्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर तसे आदेश जिल्ह्याधिकारी जारी केले आहेत.

जुन्नर शहर व परिसरामध्ये वाहतुकीत बदल करण्याबाबतचे..

जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी जुन्नर येथे उद्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रीच्या १२ वाजेपर्यंत वाहनांची होणारी गर्दी पाहता आदेश जारी करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जुन्नर शहर व परिसरामध्ये वाहतुकीत बदल करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

  1. नारायणगाव येथून जुन्नर येथे येणारी वाहतूक ही घोडेगाव फाटा, खानापूर महाविद्यालय मार्गे धामनखेल रोडने शिवनेरी किल्ल्याकडे ताथेड पार्किंग होईल.
  2. ताथेड पार्किंग ठिकाणी लावण्यात आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज, सावरगाव, वारुळवाडी, नारायणगांव, घोडेगाव मार्गे जातील.
  3. गणेशखिंड, बनकफाटा ओतूर या मार्गे शिवनेरीकडे येणारी वाहने ही मुंढे हायस्कूल व आसपासचे परिसरात असलेले पार्किंग ठिकाणी लावतील व पुन्हा त्या मार्गे कल्याण, नगर, नाशिक मार्गे जातील.
  4. आपटाळे, सोमतवाडी ता. जुन्नर कडून येणारी वाहने ही प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरुन ताथेड पार्किंग येथे जातील व पुन्हा वडज मार्गे जातील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पुण्यात गडकिल्ल्यांची अधिक संख्या असल्यामुळे तरुणांची अधिक गर्दी असते.  त्याचबरोबर आतापासून पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कसल्याही प्रकारची वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतूकीत बदल केला आहे.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल