Pune rain : संततधार..! मुठा नदीच्या वरच्या भागातल्या धरणांमधला पाणीसाठा वाढण्यास सुरुवात

| Updated on: Jul 07, 2022 | 2:35 PM

वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. साधारण 6 जुलै ते 8 जुलैदरम्यान हा मुसळधार पाऊस होणार आहे.

Pune rain : संततधार..! मुठा नदीच्या वरच्या भागातल्या धरणांमधला पाणीसाठा वाढण्यास सुरुवात
खडकवासला धरण (संग्रहित छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुण्याला पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांची पाण्याची पातळी 4.51 टीएमसी झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या महिन्यात तूट नोंदवल्यानंतर संततधार पाऊस (Continuous rain) सध्या सुरू असून त्याचा हा परिणाम आहे. गेल्या 24 तासांत वरसगाव पाणलोट क्षेत्रात 91 मिमी, पानशेत 92 मिमी, टेमघर 67 मिमी आणि खडकवासला 17 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने चार धरणांमधील जलसाठा आता 4.51 टीएमसी झाला आहे. धरणांच्या (Pune Dams) पाणलोट क्षेत्रात मंगळवारी 2.96 टीएमसी पाऊस झाल्याने बुधवारी सकाळी पाणीसाठा 3.67 टीएमसी होता. मुठा नदीच्या वरच्या बाजूला असलेल्या या धरणांमधील पाणीसाठा गेल्या आठवड्यात कमी पावसामुळे 2.5 टीएमसीवर गेला होता. पाऊस अद्याप सुरू असून धरणांमधील पाणीसाठ्यात पुरेशी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

11 जुलैपर्यंत पाणीकपात नाही

राज्याच्या जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला पाण्याच्या परिस्थितीबद्दल सतर्क केले होते आणि योग्य पाणी व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पीएमसीने 4 जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची घोषणा करून 30 टक्के पाणीकपात लागू केली होती. त्याचा नियमित वापर 1,650 एमएलडीच्या तुलनेत सुमारे 1,200 एमएलडी होत आहे. दरम्यान, पुणे महापालिकेने आषाढी एकादषी तसेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 11 जुलैपर्यंत सामान्य पुरवठा पूर्ववत केला आहे. परंतु नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन तो वाढविण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आठवड्याच्या शेवटी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हे सुद्धा वाचा

धरणे भरण्यास सुरुवात

वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. साधारण 6 जुलै ते 8 जुलैदरम्यान हा मुसळधार पाऊस होणार आहे. त्यानंतरही पाऊस सुरू राहू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. कालपासूनच्या जोरदार पर्ज्यन्यवृष्टीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे 11 जुलैनंतर महापालिका जे काही वेळापत्रक ठरवणार आहे, त्यात पाणीकपात होणार नाही, अशी पुणेकरांना आशा आहे.