Vijay Shivtare : पुरंदरमध्ये मृत्यू झालेल्या घटनेची चौकशी करा; विजय शिवतारेचं मुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांना पत्र

| Updated on: Jun 01, 2022 | 5:13 PM

कचरावेचकांना मारहाण झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. खोटा पोस्टमार्टम रिपोर्ट तयार केला. आय व्हिटनेस असतानाही खोटा रिपोर्ट कसा तयार केला, असा सवाल विजय शिवतारे यांनी केला आहे.

Vijay Shivtare : पुरंदरमध्ये मृत्यू झालेल्या घटनेची चौकशी करा; विजय शिवतारेचं मुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांना पत्र
पुरंदरमधील कचरावेचकांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करताना विजय शिवतारे
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुरंदरमध्ये मृत्यू झालेल्या घटनेची चौकशी करा, अशी मागणी शिवसेना माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना याविषयी पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सासवडमध्ये (Saswad) रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचरावेचकांना मारहाण करण्यात आली होती. सासवड नगरपरिषदेच्या बाजूला अंडाभूर्जी चालवणाऱ्या व्यावसायिकाने ही मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या मारहाणीत दोन कचरावेचकांचा मृत्यू (Death) झाला होता. त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यावरही शिवतारे यांनी संताप व्यक्त केला आहे. नगरपालिका विशिष्ट पक्षाच्या ताब्यात आहे, म्हणून घाईघाईने मृतदेहाची विल्हेवाट लावली, ते जाळण्यात आले. हा बिहार नाही, महाराष्ट्र आहे, हा अन्याय आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

विजय शिवतारे यांनी काय म्हटले?

कचरावेचकांना मारहाण झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. खोटा पोस्टमार्टम रिपोर्ट तयार केला. आय व्हिटनेस असतानाही खोटा रिपोर्ट कसा तयार केला, असा सवाल त्यांनी केला आहे. एसपींना यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. काँग्रेसचे आमदार पोलीस स्टेशन चालवतात. काही घटना झाली, की ते हजर असतात, असा आरोप करत मारहाण झाली असताना रिपोर्ट बदलला गेल्याचे शिवतारे म्हणाले आहेत.

विजय शिवतारेंकडून संताप व्यक्त

हे सुद्धा वाचा

घटना काय?

कचरावेचकांना बांबूने मारहाण करत आणि अंगावर गरम पाणी फेकण्याचा संतापजनक प्रकार पुण्यात घडला. विश्रांतीसाठी हे कचरावेचक बसलेले असताना अंडाभुर्जीच्या टपरीवाल्या तरुणाने हा प्रकार केला. सासवडच्या भोंगळे वाइन्सजवळ कट्ट्यावर ही घटना घडली. या प्रकारामुळे जखमी झालेल्या कचरावेचकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका 50 वर्षे वयाच्या आणि दुसऱ्या 60 वर्षे वयाच्या पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. खून करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव निलेश उर्फ पप्पू जयवंत जगताप (रा. ताथेवाडी, सासवड) असून त्याला ताब्यात घेण्यात आले. सासवड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस उपनिरीक्षक सुनिल चिखले यांनी या प्रकरणी काल रात्री फिर्याद दिली. तर फिर्याद अंमलदार विनय झिंजुरके यांनी दाखल केली होती.