AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laxman Hake: मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली तरी… लक्ष्मण हाके यांचा सरकारला मोठा इशारा, म्हणाले अफाट ओबीसी…

Laxman Hake on Mumbai OBC Agitation: मराठा आंदोलक मुंबईत धडकण्याचा इशारा कालच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तर आता प्राध्यापक लक्ष्मण हाके हे सुद्धा इरेला पेटले आहेत. ओबीसी बांधवांना मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.

Laxman Hake: मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली तरी... लक्ष्मण हाके यांचा सरकारला मोठा इशारा, म्हणाले अफाट ओबीसी...
लक्ष्मण हाके, ओबीसी नेतेImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 30, 2026 | 9:52 AM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात केली. त्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा इशारा दिला आहे. तर त्याचवेळी आता प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सुद्धा सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. ओबीसी बांधवांना मुंबईत आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यानंतर हाके यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.  त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरही बोचरी टीका केली. येत्या  दोन दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

मुंबईत ओबीसी मोर्चा धडकणार?

1 सप्टेंबर रोजी पोलिसांनी मुंबईमधील आंदोलनाची परवानगी नाकारली असली तरी अफाट ओबीसी बांधव मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघणार असा इशारा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. ओबीसी बांधवांना मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर हाके यांनी मोठा इशारा दिला आहे. त्याचवेळी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आम्ही मुंबईला मोर्चा घेऊन जाणार म्हणजे जाणारच असे त्यांनी ठणकावून सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोचरी टीका

सरकारमधील सर्वच नेते मनोज जरांगे यांच्या जवळचे आहेत. मनोज जरांगे यांचे सरकारमधील नेते हे लाड पुरवत आहेत. 45 लाख गाड्या घेऊन मनोज जरांगे म्हणतात आम्ही मुंबईला जाणार आहोत मात्र मनोज यांना कुणीतरी सांगावं महाराष्ट्रात गाड्यांची संख्या किती आहे? मुंबईला जाण्यासाठी म्हणून जरांगे नेपाळ आणि इतर देशातील गाड्या मागवणार आहेत का? अशी बोचरी टीकाही हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर केली आहे.

जरांगे हे आता वर्चस्वाची भाषा बोलत आहेत. ते मुख्यमंत्र्यांचा अपमान करत आहेत. जरांगे यांना भाजपने रेड कार्पेट टाकले ,तर भाजप संपून जाईल अशी टीकाही त्यांनी काल केली. ओबीसी नेत्यांना लक्ष्य करणाऱ्या जरांगे यांचे इतके लाड का करण्यात येत आहेत? असा सवालही त्यांनी विचारला. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पुण्यातून 1 सप्टेंबर रोजी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजदेखील सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. कुणबी प्रमाणपत्र काढा आणि ओबीसींना गाडा असा प्रकार सुरू आहे. ओबीसीमधून मराठा समाजास आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण उद्धवस्त होईल असा आरोप त्यांनी केला.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप