Vidhan Parishad Election : लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक विधान परिषदेसाठी मतदान करणार; पण चंद्रकांत पाटील म्हणतात…

| Updated on: Jun 19, 2022 | 3:46 PM

भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोघेही आजारी असून सध्या रुग्णालयात आहेत. मात्र अशा अवस्थेतही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान केले होते. विधानपरिषदेसाठीही आपण येणार असल्याचे दोघांकडूनही सांगण्यात आले आहे.

Vidhan Parishad Election : लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक विधान परिषदेसाठी मतदान करणार; पण चंद्रकांत पाटील म्हणतात...
मुक्ता टिळक/लक्ष्मण जगताप
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक सहभागी होणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी दोघेही अॅम्ब्युलन्समधून मुंबईत पोहोचले होते. आता 20 जूनच्या विधान परिषदचेच्या मतदानालाही मुंबईला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मी 19 जूनला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होऊन स्टेबल होईल. त्यानंतर 20 तारखेला थेट मतदानाला जाईल, असे मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनी शुक्रवारीच जाहीर केले आहे. मात्र तरीदेखील दोघांच्याही प्रकृतीचा अंदाज घेऊनच निर्णय घेण्यात येईल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली जाणार आहे. देवेंद्र फडणवीस जगताप कुटुंबीयांशी चर्चा करतील, त्यानंतरच निर्णय होणार आहे.

सहाय्यक वापरण्याची परवानगी

20 जूनला विधानपरिषदेसाठी मतदान होणार आहे. त्याची लगबग सर्वच पक्षांमध्ये दिसून येत आहे. अनेक आमदार तर दोन दिवसांपासून मुंबईत आहे. पक्षाने बोलावल्याने त्यांचा मुक्काम मुंबईत आहे. दरम्यान, भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोघेही आजारी असून सध्या रुग्णालयात आहेत. मात्र अशा अवस्थेतही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान केले होते. विधानपरिषदेसाठीही आपण येणार असल्याचे दोघांकडूनही सांगण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस जगताप कुटुंबीयांशी बोलून नंतर निर्णय घेतला जाणार आहे. जगताप आणि टिळक या दोघांनाही मतदान करण्यासाठी सहाय्यक वापरण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आयोगाने ही परवानगी दिल्याचे भाजपातर्फे सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा

राजकीय पक्षांकडून सावधगिरी

विधानसभेत भाजपाचे 106 आमदार आहेत. स्वतःच्या आमदारांव्यतिरिक्त पक्षाला बाहेरून 24 आमदारांचा पाठिंबा लागणार आहे. तर विधान परिषद निवडणुकीत सर्व पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाला 130 मतांची गरज असणार आहे. दुसरीकडे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे विजयासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा कमी झाला आहे. तरीही काँग्रेस आणि भाजपसमोर जास्तीचा एक उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान कायम असणार आहे. तर विधान परिषद निवडणुकीसाठी गुप्त मतदान असणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष अधिक सावध झाले आहेत.