AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

msrtc st bus | एसटी आहे कुठे? तुम्हालाही कळणार, पुणे बसस्थानकावर होणार हे बदल

msrtc st bus | राज्य परिवहन महामंडळाची बस ही शहर आणि ग्रामीण भागात सर्वत्र आहे. परंतु आता काळाप्रमाणे एसटी बदलत आहे. नवनवीन बदल एसटीत केले जात आहेत. आता तुमची एसटी कुठे आहे, हे तुम्हाला समजणार आहे.

msrtc st bus | एसटी आहे कुठे? तुम्हालाही कळणार, पुणे बसस्थानकावर होणार हे बदल
ST BUSImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 17, 2023 | 2:02 PM
Share

पुणे | 17 ऑक्टोंबर 2023 : सर्वसामान्य प्रवासी एसटीने प्रवास करतात. लाखो व्यक्ती रोज एसटी बसमधून प्रवास करत असतात. एसटीमधून प्रवास करणाऱ्यांना महिला प्रवाशांना अर्ध्या तिकीटात प्रवास करता येते. वरिष्ठ नागरिकांनाही अर्ध्या तिकीटात प्रवास करण्याची सवलत आहे. तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करण्याची सवलत दिली जाते. यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आता एसटी बसही काळाप्रमाणे बदलत आहे. तुम्हाला तुमची एसटी कुठे आहे, समजणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसेसला व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम बसवली आहे.

काय आहे ही प्रणाली

काळाप्रमाणे एसटी बदलत आहे. एसटीने व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम बसवल्यामुळे एसटी सध्या कुठे आहे, हे कळणार आहे. तसेच बस पुढच्या थांब्यावर किती वाजपर्यंत पोहचणार आहे, हे समजणार आहे. ही सेवा येत्या नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. यामुळे प्रवाशांना एसटीची वाट पाहत बसस्थानकावर थांबावे लागणार नाही. तसेच चौकशी कशात जाऊन बस केव्हा येणार? याची चौकशी करण्याची गरज पडणार नाही.

प्रवाशांना कसे कळणार

एसटीने स्वत:चे अ‍ॅप विकसित केले आहे. हे अ‍ॅप नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होणार आहे. या अ‍ॅपमध्ये बसचे लाईव्ह लोकेशन कळणार आहे. बस स्थानकावरुन बस निघालेल्या मार्गावर ठरविक ठिकाणी जात आहे की नाही, ही माहिती कळणार आहे. यामुळे बेशिस्त वाहन चालकांवर अंकुश ठेवता येणार आहे. बस थांब्यावर थांबली नाही तरी ही माहिती समजणार आहे. त्या माहितीचा वापर करुन चालकावर कारवाई करता येणार आहे.

पुणे स्थानकात होणार बदल

पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर इलेक्ट्रीक फलक बसवले जात आहे. या फलकाच्या माध्यमातून आगारातील सर्व बसेसची माहिती दिली जाते. तसेच नवीन प्रणालीमुळे बस कुठे, कोणत्या ठिकाणी, किती वेळ थांबली? ही माहिती मिळणार आहे. अनधिकृत ठिकाणी बस थांबली असेल तर का थांबली? याची शहनिशा ट्रॅकिंगमुळे शक्य होणार आहे. या प्रणालीमुळे कामचुकार बसचालकांना वचक बसेल, असे स्वारगेट आगाराचे प्रमुख भूषण सूर्यवंशी यांनी सांगितले.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....