Pune : पुण्यात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार, महादेव जानकरांची भाजपपासून फारकत?

पुण्यात रासपने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने भाजपला पहिला धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची पुण्यात कोणाबरोबर युती होणार नाही, पुणे महापालिकेसाठी 166 जागा रासप लढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे.

Pune : पुण्यात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार, महादेव जानकरांची भाजपपासून फारकत?
महादेव जानकर
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 5:10 PM

पुणे : राज्यात पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पुणे, मुंबईसारख्या अनेक मोठ्या महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसलीय. पुण्यात भाजप त्यांच्या पूर्ण ताकद लावून लढत आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत, तर पुणे महापालिकेच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच रासप भाजपपासून फारकत घेणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

पुण्यात रासपची स्वबळावर लढण्याची घोषणा

पुण्यात रासपने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने भाजपला पहिला धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची पुण्यात कोणाबरोबर युती होणार नाही, पुणे महापालिकेसाठी 166 जागा रासप लढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे. त्यांनी रासपच्या कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला आहे. त्यामुळे राजसप भाजपपासून कायमची फारकत घेणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

पुण्यात कोण बाजी मारणार?

पुणे पुन्हा काबीज करण्यासाठी अजित पवार पूर्ण ताकद लावताना दिसून येत आहेत. तर पुण्यातली सत्ता राखण्यासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील असे बडे नेते मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे पुण्यात जाऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिसून येत आहे. शिवसेनेकडून पुणे जिंकण्याची जबाबदारी संजय राऊत यांना देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात चौरंगी लढत होताना दिसून येत आहे. पुणे महानगर पालिकेची सत्ता कोण काबीज करणार हे निवडणुकीनंतरच कळेल, रासपच्या स्वबळावर लढण्याचा थोडाफार फटका तरी भाजपला बसेल एवढं मात्र नक्की.

Nagpur School | शहरातील एक ते सातच्या शाळांना थांबा, केव्हा घेणार मनपा प्रशासन निर्णय?

Madhya Pradesh Crime: घरगुती वादातून दिराकडून वहिनीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या

Vinod Kambli | माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ऑनलाईन गंडा, KYC च्या नावे 1.14 लाखांची लूट