Weather Update : पुण्यासह सातारा जिल्ह्यात पावसाचं कमबॅक, मुंबईसह रायगडमध्ये पावसाचा इशारा

| Updated on: Aug 14, 2021 | 1:51 PM

भारतीय हवामान विभागाचे जेष्ठ अधिकारी के. ए. एस होसाळीकर यांनी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील, अस अंदाज असल्याची माहिती दिली आहे.

Weather Update : पुण्यासह सातारा जिल्ह्यात पावसाचं कमबॅक, मुंबईसह रायगडमध्ये पावसाचा इशारा
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Follow us on

पुणे: भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे आणि सातारा जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. तर, सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी आज सकाळपासून पावसानं हजेरी लावलीय. साताऱ्यात आज सकाळपासूनचं पावसाच्या सरी अधून मधून कोसळतं आहेत.

पुण्यात पावसाची हजेरी

पुणे शहरातील दक्षिण भागात कात्रज, भारती विद्यापीठ, धनकवडी, बालाजीनगरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात गेल्या चार दिवसांमध्ये पावसानं विश्नांती घेतली होती. मात्र, आज हलक्या पावसाला सुरुवात झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

साताऱ्यातही पावसाची हजेरी

सातारा जिल्ह्यातही पावासानं कमबॅक केलं आहे. आज सकाळपासून पाऊस सुरु झाला आहे. सातारा शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाला सुरुवात झाली आहे. साताऱ्यात आज सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं. गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं छत्री न घेता बाहेर पडलेल्या सातारकरांची पावसामुळं धांदल उडालेली पाहायला मिळाली.

मुंबई, रायगडला पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाचे जेष्ठ अधिकारी के. ए. एस होसाळीकर यांनी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील, अस अंदाज असल्याची माहिती दिली आहे. पुढील तीन तासात मुंबईसह रायगड जिल्ह्यात पाऊस होईल, अशी माहिती देण्यात आलीय.

बुलडाण्यात पावसाची प्रतीक्षा

जिल्ह्यतील पिकांना दमदार पावसाची ओढ, जमिनीत ओलावा झाला कमी, पावसा अभावी पिकांमध्ये फुल गळतीचे प्रमाण वाढले, जिल्ह्यात 6 लाख 82 हजार हेक्टर वर झाली पेरणी, पाऊस कमी झाल्याने जमिनीला पडल्या भेगा, त्यामुळं पिके करपत असल्याने शेतकऱ्यांवर आता आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता,

इतर बातम्या:

सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?

Maharashtra News LIVE Update | मंदिरे उघडण्यासाठी भाजपची अध्यात्मिक आघाडी आक्रमक, औरंगाबादच्या घृष्णेश्वर मंदिरासमोर सोमवारी करणार आंदोलन

Maharashtra Rain Update light rain started in Pune and Satara today IMD warns spell at Mumbai and Raigad