जवान सुजित किर्दत, जवान नागनाथ लोभेंचं पार्थिव मूळगावी रवाना, पुणे विमानतळावर लष्कराकडून सलामी

| Updated on: Dec 23, 2020 | 10:35 AM

शहीद जवान सुजित किर्दत यांचं पार्थिव साताऱ्याकडे तर लोभे नागनाथ यांचं पार्थिव लातूरकडे रवाना झालं आहे.

जवान सुजित किर्दत, जवान नागनाथ लोभेंचं पार्थिव मूळगावी रवाना, पुणे विमानतळावर लष्कराकडून सलामी
Follow us on

लातूर : सीयाचीन भागात झालेल्या अपघातात निलंगा तालुक्यातील उमरगा येथील जवान नागनाथ अभंग लोभे (वय 35) यांना वीरमरण आले (Javan Sujit Kirdat And Javan Nagnath Lobhe). या घटनेमध्ये त्यांच्याबरोबर अन्य चार जवानांचाही मृत्यू झाला. ही घटना रविवारी सियाचीन भागामध्ये घडली होती. आज शहीद नागनाथ लोभे यांचं पार्थिव लातूरला आणण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि आई-वडील असा परिवार आहे. निलंगा शहरा जवळच्या उमरगा गावात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर साताऱ्याचे जवान सुजित किर्दत सिक्कीममध्ये कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. या दोन्ही शहिदांचे पार्थिव आज पुण्यात पोहोचले. त्यानंतर या जवानांच्या पार्थिवांना त्यांच्या त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आलं आहे (Javan Sujit Kirdat And Javan Nagnath Lobhe).

नागनाथ लोभे यांना सियाचीनमध्ये वीरमरण

शहीद जवान नागनाथ लोभे हे रविवारी सकाळी सियाचीन भागात गस्तीवर गेले होते. यादरम्यान, त्यांची गाडी खोल दरीत कोसळली आणि त्यात गस्तीवर असलेल्या पाचही जवांनाचा मृत्यू झाला. सध्या नागनाथ लोभे यांचे पार्थिव उमरगा (हाडगा) येथे आणण्याची प्रक्रिया सुरु असून आज त्यांचं पार्थिव गावी पोहोचणार आहे. त्यानंतर गावातच शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

साताऱ्याचे जवान सुजित किर्दत सिक्कीममध्ये कर्तव्य बजावताना शहीद

दोन दिवसांपूर्वी सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथील जवान सुजित किर्दत शहीद झाले. साताऱ्यातील जवान सुजित नवनाथ किर्दत सिक्कीममध्ये कार्यरत होते. सुजित किर्दत 106 इंजिनिअर रेजिमेंट सिक्किम याठिकाणी ड्युटीवर होते. ड्युटी बजावत असताना बर्फावरुन जिप्सी गाडी घसरुन दरीत कोसळली यामध्ये सुजित किर्दत यांना वीरमरण आले आहे.

दोन्ही जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी रवाना

शहीद जवान सुजित किर्दत यांचं पार्थिव साताऱ्याकडे तर लोभे नागनाथ यांचं पार्थिव लातूरकडे रवाना झालं आहे. यावेळी पुणे विमानतळावर लष्कराकडून या दोन्ही शहिदांना सलामी देण्यात आली. दोन्ही जवानांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आलं (Javan Sujit Kirdat And Javan Nagnath Lobhe).

बी इ जी कमांडड ब्रिगेडियर एम जे कुमार आणि इतर 5 लष्करी अधिकारी यांनी श्रद्धांजली वाहून जवानांनी सलामी दिली. साताऱ्यातील जवान सुजित नवनाथ किर्दत आणि लातुरचे जवान लोभे नागनाथ सिक्कीममध्ये कार्यरत होते. सुजित किर्दत 106 इंजिनिअर रेजिमेंट सिक्किम याठिकाणी ड्युटीवर होते.

Javan Sujit Kirdat And Javan Nagnath Lobhe

संबंधित बातम्या :

साताऱ्याचे जवान सुजित किर्दत सिक्कीममध्ये कर्तव्य बजावताना शहीद

Kolhapur | कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण, कुटुंबावर शोककळा

Kolhapur | भारत-पाकमध्ये धुमश्चक्री, कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण