साताऱ्याचे जवान सुजित किर्दत सिक्कीममध्ये कर्तव्य बजावताना शहीद

सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथील जवान सुजित किर्दत शहीद झाले आहेत.(Sujit Kirdat matyer)

साताऱ्याचे जवान सुजित किर्दत सिक्कीममध्ये कर्तव्य बजावताना शहीद

सातारा: सैनिकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील आणखी जवानाला वीरमरण आलं आहे. सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथील जवान सुजित किर्दत शहीद झाले आहेत. साताऱ्यातील जवान सुजित नवनाथ किर्दत सिक्कीममध्ये कार्यरत होते. ( Sujit Kirdat martyr in Sikkim in accident)

सुजित किर्दत 106 इंजिनिअर रेजिमेंट सिक्किम याठिकाणी ड्युटीवर होते. ड्युटी बजावत असताना बर्फावरुन जिप्सी गाडी घसरुन दरीत कोसळली यामध्ये सुजित किर्दत यांना वीरमरण आले आहे. सुजित किर्दत यांच्या निधनाची माहिती कळताच चिंचणेर निंब गावावर शोककळा पसरली आहे.

सुजित किर्दत यांचे पार्थिव मंगळवार(22 डिसेंबरला) चिंचणेरमध्ये येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. सुजित यांच्या पश्चात पत्नी,दोन लहान मुले, वडील,भाऊ असा परिवार आहे. चिंचणेर ग्रामस्थांनी सुजित किर्दत यांना अभिवादन करणारे फलक लावले आहेत.  ( Sujit Kirdat martyr in Sikkim in accident)

सिक्कीमध्ये अपघातात तीन जवान शहीद

भारत-चीन बॉर्डरवर गस्त घालत असताना सिक्किमध्ये भारतीय जवानांची गाडी बर्फावरून घसरुन दरीत कोसळली. रविवारी ही घटना घडली आहे. पूर्व सिक्कीमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी एस.पी. येलासरी यांनी जिप्सी गाडी बर्फावरून घसरुन दरीत कोसळली. या घटनेत तीन जवान आणि जवानाच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

सिक्कीममधील जवाहलाल नेहरु रोडवर नाथुलापासून 17 मैलावर जिप्सी दरीत कोसळली. अपघातात जखमी झालेल्या जवानांना कोलकाता येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहनातून जवानांचे मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

लातूरच्या निलंग्यातील नागनाथ लोंभे यांना वीरमरण

लातूर जिल्ह्यातील उमरगा (हाडगा) येथील जवान नागनाथ अभंग लोभे यांनाही चीन सीमेवर कर्तव्य बजावताना रविवारी पहाटे वीरमरण आले होते. भारत-चीन सीमेवर सियाचीन भागात गस्त घालत असताना बर्फावरुन गाडी घसरुन दरीत कोसलळी. या घटनेमध्ये एकूण पाच जवांनाना वीरमरण आले होते.

संबंधित बातम्या:

Kolhapur | कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण, कुटुंबावर शोककळा

Kolhapur | भारत-पाकमध्ये धुमश्चक्री, कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण

( Sujit Kirdat martyr in Sikkim in accident)

Published On - 5:58 pm, Mon, 21 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI