AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून लॉटरी जाहीर

आपलं स्वत:चं एक घर व्हावं असं प्रत्येक नागरिकाचं स्वप्न असतं. परिस्थितीमुळे काही नागरीक आपलं गाव सोडून शहरात येतात.

सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून लॉटरी जाहीर
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 05, 2023 | 9:59 PM
Share

पुणे : आपलं स्वत:चं एक घर व्हावं असं प्रत्येक नागरिकाचं स्वप्न असतं. परिस्थितीमुळे काही नागरीक आपलं गाव सोडून शहरात येतात. शहरात नोकरी मिळवून किंवा व्यवसाय करुन स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात. अनेकजण सुरुवातीला भाडे तत्वावर घर घेतात. काबाडकष्ट करुन आपला उदरनिर्वाह करतात. अशा नागरिकांचं शहरात आपल्या हक्काचं घर व्हावं, अशी इच्छा असते. अशा सर्वसामान्य नागरिकांना म्हाडाची खूप चांगली मदत होते. सर्वसामान्यांना शहरी भागात कमी दरात घर उपलब्ध करुन देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडाने यावेळी पुणे शहरासाठी सोडत जाहीर केलीय.

म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5990 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. त्यासाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांच्या हस्ते आज करण्यात आला.

विशेष म्हणजे म्हाडातर्फे तयार करण्यात आलेले IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management system) या नूतन संगणकीय अॅपचा वापर करणारे पुणे मंडळ हे म्हाडाचे सर्वात पहिले मंडळ आहे.

नव्या प्रक्रियेनुसार नोंदणीकरणा दरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार हे म्हाडाच्या विविध मंडळांच्या संगणकीय सोडतीतील कायमस्वरूपी पात्र अर्जदार ठरणार असून पुणे मंडळाच्या सदनिकांची संगणकीय सोडत 17 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी दहा वाजता नेहरू मेमोरियल हॉल येथे काढण्यात येणार आहे.

IHLMS 2.0 या नूतन संगणकीय अॅपच्या साहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस आज दुपारी बारा वाजेपासून सुरवात झालीय. आज सायंकाळपर्यंत सुमारे 4400 अर्जदारांनी नोंदणी प्रक्रियेस सुरवात केली आहे.

नवीन आज्ञावली नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरणार आहे. कारण अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या अॅपच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत.

या सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमच्या साहाय्याने आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतात.

अर्जदारांच्या सोयीकरिता  https://housing.mhada.gov.in  या म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच येथे अॅप डाउनलोड करण्याची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, व्हिडीओस, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहितीचे अवलोकन करावे, असे आवाहन पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी माने यांनी केले आहे.

IHLMS 2.0 या संगणकीय ऍप अंतर्गत अर्ज नोंदणी जरी अमर्याद काळ सुरु राहणार असली तरी पुणे मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदार 5 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकतात. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या ऍप वरून निष्क्रिय करण्यात येणार आहे.

6 फेब्रुवारी 2023  रात्री 11.59 पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील, तसेच दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.

अशाप्रकारे सर्व कागद पत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच या अॅपद्वारे पात्र ठरविले जातील व सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 15 फेब्रवारी 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर केली जाणार आहे.

17 फेब्रुवारी रोजी पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे, ई-मेल द्वारे तसेच अॅपवर प्राप्त होणार आहे. नूतन सोडत संगणकीय सोडत प्रणालीचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे यशस्वी अर्जदारांना आपल्या सदनिकेचे तात्पुरते देकार पत्र पुढील दोन दिवसांतच ऑनलाईन ऍपमध्ये प्राप्त होणार आहे .

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५९९० सदनिकांपैकी २९०८ सदनिका या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील असल्याने संगणकीय सोडतीत त्यांचा समावेश असणार नाही.  तसेच  म्हाड कायद्यातील तरतुदींनुसार प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील सदनिकांची तिसरी सोडत असून पात्रतेचे निकष यांकरिता लागणार नाहीत.

अर्जदाराने अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर त्यांना तात्पुरते देकार पत्र  दिले जाईल. सदनिकेची किंमत पूर्ण भरल्यानंतर ताबा प्रक्रिया लगेच सुरु करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील सदनिकांची माहिती म्हाडाचे अधिकृत संकेत स्थळ https://lottery.mhada.gov.in वर मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

माने यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे की, नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस पुणे मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....