Raj Thackeray : देशातील हिंदूंनो तयार राहा, 3 तारखेपर्यंत त्यांना कळलं नाही तर जशास तसे उत्तर देऊ; राज ठाकरे पुन्हा आक्रमक

| Updated on: Apr 17, 2022 | 12:35 PM

मशिदीवरचे भोंगे हा लोकांना वाटतं हा धार्मिक विषय मात्र हा सामाजिक विषय आहे. रमजान (Ramzan) सुरू आहे. मात्र 3 तारखेपर्यंत त्यांना समजले नाही, कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा त्यांना स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

Raj Thackeray : देशातील हिंदूंनो तयार राहा, 3 तारखेपर्यंत त्यांना कळलं नाही तर जशास तसे उत्तर देऊ; राज ठाकरे पुन्हा आक्रमक
औरंगाबादच्या सभेसाठी पुण्यात बॅनरबाजी
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : मशिदीवरचे भोंगे हा लोकांना वाटतं हा धार्मिक विषय मात्र हा सामाजिक विषय आहे. इथे एक मुस्लीम (Muslim) पत्रकार आहेत. ते स्वत: बाळा नांदगावकरांना भेटले आणि आपल्या लहान मुलाला अजानचा (Azan) त्रास होत असल्याचे सांगितले. त्यामुळे याचा त्रास मुस्लिमांनाही होत आहे. आता रमजान (Ramzan) सुरू आहे. मात्र 3 तारखेपर्यंत त्यांना समजले नाही, कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा त्यांना स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. राज्यात, देशात दंगली भडकवण्याचा कोणताही हेतू नाही, कोणाच्याही प्रार्थनेला विरोध नाही. मात्र लाउडस्पीकर लावणार असाल, तर आमचीही प्रार्थना ऐकावी लागेल. लाउडस्पीकरवरून अजान दिवसांतून पाच-पाचवेळा होणार असेल तर आमचीही प्रार्थना दिवसांतून पाचवेळा ऐकावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

दोन घोषणा

– महाराष्ट्र दिनी औरंगाबादला एक मेला जाहीर सभा घेणार आहे
– पाच जूनला सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार

काय दिला इशारा?

या देशात, महाराष्ट्रात दंगली नको आहेत, हाणामारी नको आहे. या देशातील, महाराष्ट्रातील शांतता भंग करायची इच्छा नाही. पण माणुसकीच्या नात्याने मुस्लीम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, गरजेचे आहे. त्यांच्या प्रार्थनेला विरोध केलेला नाही. पण त्यांना लाऊडस्पीकरवरूनच ऐकायचे असेल तर आमच्याही आरत्या त्यांना लाऊडस्पीकरवरून ऐकाव्या लागतील. तीन तारखेपर्यंत वाट पाहू, नंतर जशास तसे उत्तर देऊ, असे ते म्हणाले.

‘आमचे हात बांधलेले नाहीत’

आमच्याकडून मिरवणुका निघतात त्यावर दगडफेक होत असेल तर आम्ही शांत बसणार नाहीत. आमचे हात बांधलेले नाहीत. आम्हालाही दगड हातात घेता येतो. हे सर्व करायला भाग पाडू नका, असे ते यावेळी म्हणाले.

राज ठाकरेंची पत्रकार परिषद, सविस्तर…

आणखी वाचा :

Thane Crime: सुनेला गोळी घालून बिल्डर फरार झाला, पोलिसांना गुंगारा देत मुंब्रा, ठाण्यात लपला, दोन रात्रं रिक्षात मुक्कामही ठोकला

Ajit Pawar On James Laine : तुम्ही कारण नसताना कोणत्याही पावत्या माझ्या नावावर फाडू नका; जेम्स लेन प्रकरणावर अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Kirit Somaiya Toilet Scam : टॉयलेट घोटाळ्यात किरीट सोमय्या बॅकफुटवर? कारवाई आधी आमच्याशी संपर्क करा, सोमय्यांचं पत्रं