VIDEO | फास्टॅगवरुन मनसे नेत्या रुपाली पाटील यांची किणी टोल नाक्यावर वादावादी

| Updated on: Feb 17, 2021 | 7:18 AM

मंगळवारी रात्री किणी टोलनाक्यावर 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा लागल्यामुळे नवा वाद पाहायला मिळाला. मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची किणी टोल नाक्यावर फास्टॅगवरुन वादावादी झाली.

VIDEO | फास्टॅगवरुन मनसे नेत्या रुपाली पाटील यांची किणी टोल नाक्यावर वादावादी
Follow us on

कोल्हापूर : देशातील सर्वच टोन नाक्यांवर बुधवारी फास्टॅगला सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत मंगळवारी रात्री किणी टोलनाक्यावर 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा लागल्यामुळे नवा वाद पाहायला मिळाला. मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची किणी टोल नाक्यावर फास्टॅगवरुन वादावादी झाली. रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास रुपाली पाटील पुण्याच्या दिशेनं निघाल्या होत्या त्यावेळी किणी टोल नाक्यावर ही वादावादी झाली. या संपूर्ण घटनेचं फेसबुक लाईव्ह करण्यात आलं आहे.(MNS leader Rupali Patil Thombre’s argument at Kini Toll Naka)

फास्टॅग लागू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक होते. त्यावेळी रुपाली पाटील किणी टोल नाक्यावरुन पुण्याच्या दिशेनं निघाल्या होत्या. पण टोन नाक्यावर प्रचंड मोठी रांग लागली होती. त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी थोडी वादावादी झाल्याचंही पाहायला मिळालं. तेव्हा रुपाली पाटील यांच्या मदतीला टोल नाक्यावरील अन्य वाहन चालकही आल्याचं पाहायला मिळालं.

झिरो बॅलन्स फास्टॅग कुणाला?

देशातील काही लोकांना झिरो बॅलन्स फास्टॅग मिळणार आहेत. त्यामुळे या व्यक्तींना फास्टॅग कधीच रिचार्ज करावा लागणार नाही. या लोकांमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, उच्च न्यायालायचे मुख्य न्यायमूर्ती, केंद्र सरकारचे मुख्य सचिव, लष्कराचे कमांडर आणि अन्य सेवांमधील समकक्ष, तसेच राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

स्थानिक गावकऱ्यांना फास्टॅग लागणार?

महामार्गाच्या परिसरातील स्थानिक गावकऱ्यांनाही फास्टॅग लागणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या 20 किलोमीटर परिसरात येणाऱ्या सर्व गावांतील लोकांना 275 रुपयांत महिनाभराचा फास्टॅग दिला जाईल. आपले आधारकार्ड दाखवून गावकरी हा सवलतीच्या दरातील फास्टॅग मिळवू शकतात.

आमदार आणि खासदारांसाठी एक्झमटेड फास्टॅग

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) आमदार आणि खासदारांसाठी एक्झमटेड फास्टॅग जारी केले जातात. प्रत्येक खासदाराच्या दोन गाड्यांसाठी हे एक्झमटेड फास्टॅग देण्यात आले आहेत. या फास्टॅगमध्ये रिचार्ज करावा लागत नाही. खासदारांच्या संसदीय क्षेत्रात, राजधानी दिल्लीत येताना आणि देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर खासदारांना या एक्झमटेड फास्टॅगचा वापर करता येईल.

कसा खरेदी कराल फास्ट टॅग?

फास्ट टॅग देशभरातील कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येते. फास्ट टॅग खरेदी करण्यासाठी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट आदि बँकांसह 22 बँकांमधून खरेदी करु शकता. याशिवाय पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट टॅग खरेदी करु शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अॅपवर फास्ट टॅग खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे.

किती आहे फास्ट टॅगची किंमत?

फास्ट टॅगची किंमत दोन बाबींवर अवलंबून आहे. तुमच्याकडे वाहन कोणते आहे आणि तुम्ही कुठून फास्ट टॅग खरेदी करता यावर त्याची किंमत अवलंबून आहे. इश्यू फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटची किंमत प्रत्येक बँकेची वेगळी असू शकते. फास्ट टॅग तुम्ही घरबसल्या खरेदी करु शकता.

संबंधित बातम्या :

उद्यापासून फास्ट टॅग अनिवार्य, टॅग नसेल तर दुप्पट टोल लागणार

रस्ते अपघात कमी करण्यासाठी गडकरींचा 4E मॉडल, खरंच ‘या’ उपाययोजनांमुळे प्रति व्यक्ती 90 लाख रुपये वाचतील?

MNS leader Rupali Patil Thombre’s argument at Kini Toll Naka