रस्ते अपघात कमी करण्यासाठी गडकरींचा 4E मॉडल, खरंच ‘या’ उपाययोजनांमुळे प्रति व्यक्ती 90 लाख रुपये वाचतील?

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन कंपन्यांना कमीत कमी किंमतीत वाहनांमध्ये मूलभूत सुरक्षा पुरवण्यास सांगितले आहे (Nitin Gadkari gives road safety tips).

रस्ते अपघात कमी करण्यासाठी गडकरींचा 4E मॉडल, खरंच 'या' उपाययोजनांमुळे प्रति व्यक्ती 90 लाख रुपये वाचतील?
nitin gadkari, Toll plaza

मुंबई : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन कंपन्यांना कमीत कमी किंमतीत वाहनांमध्ये मूलभूत सुरक्षा पुरवण्यास सांगितले आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, जर आपण रस्ते अपघातात होणारे मृत्यू टाळू शकलो तर आपण प्रति व्यक्ती 90 लाख रुपयांची बचत करू शकतो, असं गडकरींनी सांगितलं (Nitin Gadkari gives road safety tips).

‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’च्या सहकार्याने तयार करण्यात आलेला जागतिक बँकेचा अहवाल प्रसिद्ध करताना केंद्रीय मंत्र्यांनी वाहन उत्पादक कंपन्यांना सुरक्षा सुविधा वाढवण्याचे आवाहन केले. रस्ते अपघात हा देशासाठी आणि राज्यांसाठी मोठा भार आहे, असं जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे (Nitin Gadkari gives road safety tips).

“रस्ते अपघातांमध्ये मृत्यूच्या बाबतीत भारत जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. ही एक दुःखद परिस्थिती आहे. जगभरात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 11 टक्के मृत्यू भारतातच होतात हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 2019 च्या अहवालानुसार, त्या वर्षी देशात 4.49 लाख रस्ते अपघात (भारतातील रस्ते अपघात) झाले आणि त्यात 1.51 लाख लोक मृत्युमुखी पडले”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“रस्ते अपघातात गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमधील वयस्कर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो. हा मृत्यूदर कमी केल्यास उत्पन्न वाढू शकते. तसेच परवडणाऱ्या रस्ते सुरक्षा कामांमुळे सार्वजनिक कल्याणाचा मोठा लाभ मिळू शकतो. भारतासारख्या देशात रस्ते अपघात हा सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा आहे आणि ते आमच्यासाठी एक आव्हान आहे”, असं नितीन गायकवाड म्हणाले.

गडकरी म्हणाले, “रस्ते सुरक्षेमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. या उपाययोजनांअंतर्गत रस्ता सुरक्षा ‘4ई’मध्ये सुधारणा करण्याचे मॉडेलही आहे. ‘4 ई’ म्हणजे अभियांत्रिकी, शिक्षण, अंमलबजावणी आणि आपत्कालीन सेवा (Engineering, Education, Enforcement and Emergency care services)”.

“सरकार विविध प्रकल्पांवर जागतिक बँकेसोबत काम करत आहे. त्यापैकी एक म्हणजे रस्ते अपघात डेटाबेस आयआरएडी सुरळीत करणे”, असं त्यांनी सांगितलं.

“गरीब कुटुंबांतील श्रीमंतांच्या तुलनेत अपघाती मृत्यूंची संख्या दुप्पट आहे. प्रत्येक नागरिकाचे जीवन सरकारसाठी मौल्यवान आहे, मग ते गरीब कुटुंबातील असो किंवा श्रीमंत कुटुंबातील असो”, असं गडकरी म्हणाले.

हेही वाचा : सरकार शेणापासून रंग बनवण्यासाठी प्रशिक्षण देणार, गावात कंपनी सुरु करुन मोठी कमाई करा, वाचा सविस्तर

Published On - 6:36 pm, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI