AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune MHADA : पुण्यात घर घेण्याची सुवर्णसंधी; म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात, काय प्रक्रिया? वाचा सविस्तर…

म्हाडाच्या या सोडतीत नियमानुसार असणाऱ्या उत्पन्न गटासाठी उत्पन्नाची मर्यादाही देण्यात आली आहे. या उत्पन्नाच्या मर्यादेनुसार ज्या कोणत्या गटात आपण बसतो, याचा विचार करून अर्जदारांनी अर्ज करावयाचा आहे.

Pune MHADA : पुण्यात घर घेण्याची सुवर्णसंधी; म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात, काय प्रक्रिया? वाचा सविस्तर...
म्हाडा (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jun 10, 2022 | 9:47 AM
Share

पुणे : पुण्यात घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ अर्थात म्हाडातर्फे (Maharashtra housing & area development authority) पुणे, सोलापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्यात गृहनिर्माण योजनेतील पाच हजार 69 सदनिका उपलब्ध होणार आहेत. या घरांच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या हस्ते गो-लाइव्ह या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरुवात झाली. या सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत 29 जुलैला सकाळी दहा वाजता पुण्यातील गृहनिर्माण भवन, आगरकर नगर येथील कार्यालयात काढली जाणार आहे. नऊ जूनला संध्याकाळी पाचपासून ऑनलाइन (Online) अर्जनोंदणीला सुरुवात झाली. नऊ जुलैच्या संध्याकाळी पाचपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदार 10 जूनरोजी सकाळी दहापासून अर्ज करू शकतात.

संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार अंतिम यादी

10 जुलैरोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. 11 जुलै रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. 12 जुलैरोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अर्जदारांना अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 21 जुलैरोजी संध्याकाळी म्हाडाच्या http://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

एकूण सदनिका किती?

– सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण 1945 सदनिका उपलब्ध

– पुणे महापालिका हद्दीत 575 सदनिका

– पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत 1370 सदनिका

– म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 279 सदनिका

– प्रधानमंत्री आवास योजनेतील 170 सदनिका

– म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत दोन हजार 675 सदनिका

क्षेत्रफळ आणि उत्पन्न गट

म्हाडाच्या या सोडतीत नियमानुसार असणाऱ्या उत्पन्न गटासाठी उत्पन्नाची मर्यादाही देण्यात आली आहे. या उत्पन्नाच्या मर्यादेनुसार ज्या कोणत्या गटात आपण बसतो, याचा विचार करून अर्जदारांनी अर्ज करावयाचा आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी मर्यादा आता वार्षिक 6 लाख रुपये तर अल्प उत्पन्न गटासाठी 6 ते 9 लाख रुपये आणि मध्यम गटासाठी 9 ते 12 लाख तर उच्च गटासाठी 12 ते 18 लाख रुपये प्रतिवर्ष असणार आहे. उत्पन्नानुसार घराचे क्षेत्रही बदलण्यात आले आहे.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा