Pimpri Chinchwad crime | इंस्टाग्रामवर ‘थेरगाव क्वीन’च्या 40 पेक्षा जास्त अकाऊंटबाबत पिंपरी पोलिस उचलणार ‘हे’ पाऊल

| Updated on: Feb 11, 2022 | 7:05 PM

सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स वाढावेत यासाठी काही अल्पवयीन मुलामुलींकडून ही शक्कल लढवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील काही तरुणांकडून धमकीवजा अश्लील भाषेचा वापर करून व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. यातून समाजस्वास्थ्य बिघडविण्याचे कृत्य केले जात आहे.

Pimpri Chinchwad crime | इंस्टाग्रामवर थेरगाव क्वीनच्या 40 पेक्षा जास्त अकाऊंटबाबत पिंपरी पोलिस उचलणार हे पाऊल
Instagram
Follow us on

पिंपरी – प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर (Social Media ) अश्लील भाषेत व्हिडीओ टाकणाऱ्या थेरगाव क्वीनवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police)नुकतीच कारवाई केली. त्यानंतर पुन्हा असे न करण्याच्या बोलीवर या अठरा वर्षीय तरुणीची पोलिसांनी सुटकाही केली आहे. त्यानंतर आता पुन्हा सोशल मीडियावर ‘थेरगाव क्वीन'(Thergaon Queen)च्या नावाने जवळपास 40  अकाऊंट असल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे तर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर याच अकाऊंट वरून खोडसाळपणा करत या विविध अकाऊंटवरून धमकीवजा व अश्लील भाषेत व्हिडिओ शेअर करून पोलिसांना आवाहन दिल्याचे समोर आले आहे.

फॉलोवर्स वाढणयासाठी शक्कल

सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स वाढावेत यासाठी काही अल्पवयीन मुलामुलींकडून ही शक्कल लढवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील काही तरुणांकडून धमकीवजा अश्लील भाषेचा वापर करून व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. यातून समाजस्वास्थ्य बिघडविण्याचे कृत्य केले जात आहे. त्यामुळे वाकड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून थेरगाव येथील एका तरुणीला अटक केली होती. तसेच तिच्या साथीदार ‘भाई’ला देखील पुण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. यापुढे असे व्हिडिओ करणार नाही, असे म्हणत या ‘भाई’ने माफी मागितली होती.

व्हिडीओ व्हायरल
पोलिसांच्या कारवाई नंतरही इंस्टाग्रामवरील ‘थेरगाव क्वीन’ नावाच्या अकाऊंटवरून थेरगाव क्वीन’ असलेल्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्यातून थेट पोलिसांनाच आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी ‘थेरगाव क्वीन’ असलेल्या संबंधित तरुणीकडे याबाबत चौकशी केली. व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेले इंस्टाग्रामवरील अकाउंट संबंधित तरुणीचे नसून त्या पद्धतीचे 40 पेक्षा जास्त अकाउंट असल्याचे समोर आले. हे सर्व अकाउंट कोणाचे आहेत, ते अकाउंट कोण ऑपरेट करीत आहेत, याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मात्र अश्या प्रकारच्या बनावट अकाऊंटवरती पोलिसांची नजर असून कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट आढळ्यास सायबर गुन्ह्यांतंर्गत कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीक यांनी दिली आहे.

Pimpri Chinchwad crime | सीए च्या परीक्षेत अपयश आल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल… परिसरात खळबळ

Malegaon Hijab Day : कर्नाटकच्या घटनेचे मालेगावात पडसाद, जमेत ए उलमातर्फे ‘हिजाब दिवस’ चे आयोजन

St Worker Strike : 18 फेब्रुवारीपर्यंत विलीनीकरणाचा अहवाल सादर करा, राज्य सरकारला कोर्टाचा दणका