पुणे महानगर नियोजन समितीत ग्रामीण भागाबाबत दुजाभाव, 817 गावांमधून केवळ 7 सदस्यांची होणार नेमणूक

| Updated on: Aug 23, 2021 | 1:48 PM

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) नियोजन समितीत (PMRDA Planning Committee) ग्रामीण भागाबाबत दुजाभाव केला जात असल्याचं चित्र दिसत आहे.

पुणे महानगर नियोजन समितीत ग्रामीण भागाबाबत दुजाभाव, 817 गावांमधून केवळ 7 सदस्यांची होणार नेमणूक
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) प्रारूप विकास आराखडा
Follow us on

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत (PMRDA) पुणे (Pune) जिल्ह्याच्या वर्तुळाकार समाविष्ठ होणाऱ्या विविध तालुक्यांतल्या गावांचा पीएमआरडीएमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, नियोजन समितीत (PMRDA Planning Committee) ग्रामीण भागाबाबत दुजाभाव केला जात असल्याचं चित्र दिसत आहे. कारण, समितीच्या सदस्यांची रचना करताना 30 सदस्यांपैकी ग्रामीण भागातून केवळ 7  सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. हे सदस्य नऊ तालुक्यांतल्या 817 गावांचं प्रतिनिधीत्व करतील. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी केवळ सातच सदस्य का असा सवाल केला जात आहे. (PMRDA’s Pune Metropolitan Planning Committee has less number of members from rural areas)

समितीत 30 पैकी  7 सदस्य ग्रामीण भागातले

नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार पुणे महानगर नियोजन समितीवर थेट निवडणुकीद्वारे नामनिर्देशित होणाऱ्या 30 सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे. यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाने ठरवलेल्या संख्येनुसार महानगरपालिका क्षेत्रातून 22, नगरपरिषद क्षेत्रातून 1 आणि ग्रामीण भागातून सात सदस्यांची निवड केली जाणार आहे.

निवडणुकीत महानगरपालिकेतले सर्व नगरसेवक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती आणि समाविष्ठ गावांच्या सरपंचांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत मिळून 285 मतदार आहेत. सोबतच नगर परिषदांमध्ये 114 तर ग्रामीण भागामध्ये 581 मतदार आहेत. पीएमआरडीएचा विस्तार पाहिला तर त्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचा भौगोलिक वाटा मोठा आहे. परंतु प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी आहे.

शहराप्रमाणे ग्रामीण भागाला मतदानाचा अधिकार का नाही?

शहरी भागात सर्व नगरसेवकांना महानगर नियोजन समितीच्या निवडणूक प्रक्रियेत मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रमुख वगळता इतर सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे नगरसेवकांप्रमाणे ग्रामीण भागातल्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार का नाही असा सवाल करण्यात येतोय. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनाही मतदानाचा अधिकार देण्याची मागणी केली जात आहे.

कोणत्या तालुक्यातल्या किती गावांचा पीएमआरडीएमध्ये समावेश?

पीएमआरडीएमध्ये पुणे जिल्ह्याच्या वर्तुळाकार समाविष्ठ होणाऱ्या वेगवेगळ्या तालुक्यांतल्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पुणे शहरासह मावळ तालुक्यांतल्या 189, मुळशी 144, आणि हवेली तालुक्यातल्या सर्व 108, गावांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच खेड 114, शिरूर 68, भोर 53, वेल्हा 52, दौंड 51 आणि पुरंदर तालुक्यातली 38 अशी एकूण 817 गावं पीएमआरडीएमध्ये समाविष्ठ करण्यात आली आहेत.

इतर बातम्या :

पुण्यात बिर्याणी हॉटेल मालकावर कोयत्याने वार, वादानंतर ग्राहकाचा मित्रांना बोलावून हल्ला

पुण्यात ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन, दहावी-बारावी-आयटीआय विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

सीबीएसई, आयसीएसई शाळांमध्ये मराठी शिकवली का? शाळांना अहवाल सादर करण्याचे आदेश!