AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात बिर्याणी हॉटेल मालकावर कोयत्याने वार, वादानंतर ग्राहकाचा मित्रांना बोलावून हल्ला

मयुर मते यांच्या गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी दोघे जण बिर्याणी घेण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर मते यांची शाब्दिक आणि किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरुन दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले

पुण्यात बिर्याणी हॉटेल मालकावर कोयत्याने वार, वादानंतर ग्राहकाचा मित्रांना बोलावून हल्ला
पुण्यात बिर्याणी हॉटेल चालकावर कोयता हल्ल्याचा प्रयत्न
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 23, 2021 | 1:17 PM
Share

पुणे : बिर्याणी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी कोयत्याने वार करुन हॉटेल व्यावसायिकासह दोघांच्या खुनाचा प्रयत्न केला. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागातील गणेश नगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. बिर्याणी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाचा हॉटेल व्यावसायिकाशी वाद झाला होता, त्यानंतर त्याने सहा मित्रांना बोलावून हल्ला केला.

गणेशनगरमधील एका बिर्याणी हॉटेलमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मयुर मते (वय 33 वर्ष, रा. धायरी) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सहा जणांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा शनिवारी रात्री उशिरा दाखल केला.

नेमकं काय घडलं?

मयुर मते यांच्या गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी दोघे जण बिर्याणी घेण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर मते यांची शाब्दिक आणि किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरुन दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्या दोघांनी आणि त्यांच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये घुसून कोयत्यासारख्या धारदार हत्याराने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केला.

तेव्हा हॉटेल मालकाच्या शेजारी उभा असलेल्या कामगार इसराफिल हा मध्ये आल्याने तो वार त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसून तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अनिकेत जाधव (राहणार- मुक्ताई गार्डन, धायरी), वैष्णव झाबरे (धायरी), महेश उबाळे (नऱ्हे), ओंकार सातपुते (नऱ्हे), तेजस निवंगुणे (मुरली हॉटेल, धायरी), संकेत मिरगल (लिमये नगर, धायरी) अशी आरोपींची नावे आहेत. यातील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर मुख्य आरोपीसह चार जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | मुंबईत भाजी विक्रेत्याला मारहाण CCTV मध्ये कैद, तिघांना बेड्या

फ्लॅट नावावर करुन घेण्यासाठी पोटच्या मुलांकडून मारहाण, पुण्यात 58 वर्षीय महिलेची पोलिसात तक्रार

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप