आता वयस्कर झालोय असं वाटतंय; प्रफुल्ल पटेल यांचं मिष्किल विधान

| Updated on: Oct 30, 2021 | 4:03 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आदित्य ठाकरे यांच्या उल्लेख पुतण्या असा केला आहे. तसेच विश्वजीत कदमही आपला पुतण्याच आहे. (praful patel addressing in public programme at pune)

आता वयस्कर झालोय असं वाटतंय; प्रफुल्ल पटेल यांचं मिष्किल विधान
praful patel
Follow us on

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आदित्य ठाकरे यांच्या उल्लेख पुतण्या असा केला आहे. तसेच विश्वजीत कदमही आपला पुतण्याच आहे असं सांगतानाच आता मी वयस्कर झालोय असं वाटतंय, अशी मिष्किल टिप्पणी प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.

पुण्यातील भारती विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात प्रफुल्ल पटेल बोलत होते. मराठीतच बोललं पाहिजे असं काही माझ्यावर बंधन नाही. मी मराठी प्रतिनीधी आहे. मात्र केंद्रात काम करत असताना राज्यसभा खासदार म्हणून हिंदी आणि इंग्रजी भाषेत काम करतो. आमचं गावं गोंदिया जिल्ह्यात शेवटच्या टोकावर आहे. आम्ही शेवटच्या टोकावर फेकले गेलेले लोक आहोत. आमच्यापासून मुंबई 960 किमी अंतरावर आहे आणि दिल्ली 1 हजार किमी अंतरावर आहे. आम्ही मर्यादित आहोत आणि संकुचित नाही, असं पटेल यांनी सांगितलं.

आदित्यला लहानपणापासून ओळखतो

मी माझ्या पुरतं बोलतोय. सगळ्यांच नाही. कारण मी माझ्या पुस्तक समारंभाला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना बोलावलं होत. आदित्यला मी लहानपणापासून ओळखतो. आम्हाला फक्त आमदार, खासदार नको. देशाला घडवणारे प्रतिनिधी हवेत, असं ते म्हणाले. त्यामुळे पटेल यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला की त्यांची प्रशंसा केली अशी चर्चा सुरू आहे.

डॉक्टरांना सलाम करायला आलो

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर बोलणं योग्य नाही, असं सांगत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोरोना काळातील कामावर भाष्य केलं. कोव्हीड काळात दवाखाना चालवणं किती अवघड आहे हे मी पाहिलंय,. हॉस्पिटलमध्ये यायला भीती वाटायची, कोव्हीड काळात नातेवाईक दूर पळत होते. मात्र डॉक्टरांनी चांगल काम केलं. या कामासाठी मी सलाम करायला आलोय. कोव्हीडच्या विरुद्ध लढण्यात मोठी तलवार राहिली ती म्हणजे राज्यात एवढी मोठी रुग्णसंख्या असूनही नियंत्रणात ठेऊ शकलो. ती म्हणजे डॉक्टर आणि त्यांनी योग्य ते सल्ले दिले, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडी एकत्र आली

राजकारणात आपण एकत्र आहोत. मात्र वडिलांनी उद्याचा विचार करायला शिकवलं म्हणून तुम्ही केलं. आज पुण्यात आलोय. मी दोन तीन वेळा आलो होतो. पालिकेत आलो तेव्हा समोर अनेक प्रश्न होते. तेव्हा प्रेस समोर होती. पालिकेत प्रश्न विचारला जात होता की पालिकेत एकत्रित निवडणूक लवढवणार का? मात्र आज विश्वजित कदमांनी महाविकास आघाडी एकत्रित आणलीये, असे सूचक संकेतही त्यांनी दिले.

 

संबंधित बातम्या:

UP Elections 2022: सहा निलंबित बसपा आमदारांचा सपामध्ये प्रवेश, अखिलेशने केले स्वागत

याला बाप म्हणावं की सैतान, पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, डोंबिवलीत काय चाललंय?

कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका! विनायक राऊत नारायण राणेंविरोधात सूमोटो कारवाईची मागणी करणार, नेमकं प्रकरण काय?
(praful patel addressing in public programme at pune)