Petrol Price Hike | पुण्यात पेट्रोल दरवाढी विरोधात निषेध आंदोलन ; राष्ट्रवादीने केंद्र सरकारची काढली प्रतीकात्मक अंतयात्रा

| Updated on: Mar 28, 2022 | 4:33 PM

गेल्या काही महिन्यात निवडणुका असल्यामुळे थांबवलेले ही दरवाढ आता अचानकपणे पुन्हा सुरू करण्यात आली आहे. म्हणजे केवळ निवडणुकीपुरते लोकांची फसवणूक करायची निवडणूक संपली ,की पुन्हा लोकांच्या खिशावर दरोडा टाकायचा हेच केंद्र सरकारचे धोरण आहे.

Petrol Price Hike | पुण्यात पेट्रोल दरवाढी विरोधात निषेध आंदोलन ; राष्ट्रवादीने केंद्र सरकारची काढली प्रतीकात्मक अंतयात्रा
पेट्रोल, डिझेलचे आजचे दर
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे – सातत्याने होत असलेल्या पेट्रोल दरवाढीने (Petrol price Hike )सर्व सामान्य नागरिकांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. गेल्या सात दिवसात तब्बल सहावेळा पेट्रोल वाढ झाली आहे. या पेट्रोल वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या(NCP) वतीने प्रतीकात्मक अंतयात्रा तर कार्यकर्त्यांनी मुंडन करत निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारच्या (Central Government )अख्यारीत असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये दररोज वाढ होत असून, ही वाढ थांबावी या हेतूने पर्वती विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सातारा रोड येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तर काही कार्यकर्त्यांनी यावेळी मुंडन करत आपला निषेध नोंदवला.

जनतेची ही लूट थांबली नाही तर

“दैनंदिन जीवन जगत असताना घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल या आपल्या जीवनावश्यक वस्तू आहेत. या वस्तूंचे दर वाढत राहिले तर एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे महिन्याचे बजेट कोलमडते. गेल्या काही महिन्यात निवडणुका असल्यामुळे थांबवलेले ही दरवाढ आता अचानकपणे पुन्हा सुरू करण्यात आली आहे. म्हणजे केवळ निवडणुकीपुरते लोकांची फसवणूक करायची निवडणूक संपली ,की पुन्हा लोकांच्या खिशावर दरोडा टाकायचा हेच केंद्र सरकारचे धोरण आहे. केवळ सर्वसामान्य जनतेवर ती महागाई लादयची आणि उद्योगपतींची संपत्ती वाढवणे हाच भाजपचा गेल्या सात वर्षातील अजेंडा राहिला आहे. परंतु जर देशातील जनतेची ही लूट थांबली नाही तर भविष्यात तुमच्या आमच्यासारखे मध्यमवर्गीय मारले जाणार असून हा देश पुन्हा मोठ्या आर्थिक संकटात येईल, अस शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणालेत.

Success Story : अतिरिक्त ऊसाचा प्रश्नच बनला शेतकऱ्यांच्या उद्योगाचे कारण..! वर्षाकाठी लाखोंचे उत्पन्न, वाचा सविस्तर

Latur Market : सोयाबीन-हरभरा आवकमध्ये सातत्य, आठवड्याच्या पहिल्या दिवशीचे दर काय ?

Will Smith Chris Rock : विल स्मिथनं ख्रिस रॉकला ठोसा मारला काय… इकडे ट्विटरवर आला मीम्सचा महापूर