Success Story : अतिरिक्त ऊसाचा प्रश्नच बनला शेतकऱ्यांच्या उद्योगाचे कारण..! वर्षाकाठी लाखोंचे उत्पन्न, वाचा सविस्तर
सध्या ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. यंदा क्षेत्रात वाढ झाल्याने तो अधिक तीव्रतेने जाणवत आहे. यापूर्वीही ऊसाचे गाळप रखडल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी कारखान्यांचे उंबरटे झिजवले तर काहींनी या संकटामध्ये संधी शोधली. कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील महादेव कवडे यांना तर 15 वर्षापूर्वीच या समस्याचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांनी निवडलेला वेगळी वाट आज खऱ्या अर्थाने योग्य दिशेने असल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबाद: सध्या ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी (Surplus Sugarcane) अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. यंदा क्षेत्रात वाढ झाल्याने तो अधिक तीव्रतेने जाणवत आहे. यापूर्वीही (Sugarcane Sludge) ऊसाचे गाळप रखडल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी कारखान्यांचे उंबरटे झिजवले तर काहींनी या संकटामध्ये संधी शोधली. (Marathwada) कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील महादेव कवडे यांना तर 15 वर्षापूर्वीच या समस्याचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांनी निवडलेला वेगळी वाट आज खऱ्या अर्थाने योग्य दिशेने असल्याचे दिसून येत आहे. कारखान्यांकडून ऊसतोडणीसाठी केली जाणारी टाळाटाळ आणि ऊस बिलासाठी होत असलेली फरपट याला त्रासून त्यांनी स्वता:च्या शेतामध्येच गुऱ्हाळ सुरु केले होते. यामधून केमिकलमुक्त गुळ तयार करुन लाखो रुपयांचे उत्पन्न त्यांना दरवर्षी हंगामात मिळते शिवाय स्वत:च्या शेतामधील ऊसाचा विषयही निकाली निघाला आहे.
अशी झाली सुरवात
अतिरिक्त ऊस हा दरवर्षीची समस्या बनली आहे. यंदा तो अधिक तीव्रतेने समोर आला आहे. कन्हेरवाडी येथील महादेव कवडे हे पारंपरिक पिकाप्रमाणेच ऊसाची लागवड करतात. त्यांना ऊसगाळपाच्या समस्येला तर 15 वर्षापूर्वीच सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आपल्या ऊसाचे गाळप आपणच करायचे असा निर्धार त्यांनी केले होते. पण कारखाना उभा करण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल नसल्याने गुऱ्हाळ टाकण्याचा निर्धार केला होता. 5 गुंठ्यामध्ये हे गुऱ्हाळ टाकले असून गेल्या 15 वर्षापासून सुरु असून कवडे यांना याचा दुहेरी फायदा होत आहे.
केमिकल मुक्त गुळाला मागणीही
गुऱ्हाळ टाकतानाच यामधून तयार होणारा गुळ हा केमिकलमुक्त असणार असा निर्धार त्यांनी केला होता. ज्याची मागणी त्याचेच उत्पादन हेच सूत्र त्यांनी अवलंबले म्हणूनच आज केवळ कळंब तालुक्यातच नाही तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि लातूर मध्ये या गुळाच्या ढेपीला मागणी सुरु झाली आहे. या अनोख्या प्रयोगातून घरच्या ऊसाचा तर प्रश्न मार्गी लागलाच पण कवडे यांच्या वर्षाकाठच्या उत्पादनात 5 ते 6 लाखांची भर पडली आहे.
कारखान्यांकडून दुजाभाव
यंदा क्षेत्र वाढल्यामुळे ऊसाचा प्रश्न निर्माण झाला असला तरी दरवर्षीची परस्थिती ही अशीच असते. कारखाने हे शेतकऱ्यांच्या हितासाठी असले तरी प्रत्यक्षात येथील वास्तव हे वेगळे आहे. ऊसतोड कामगारांपासून ते चेअरमन पर्यंत सर्वांची मर्जी राखण्यातच शेतकरी त्रस्त होतो. ऊस गाळपासाठी कारखान्यांचे उंबरटे झिजवायचे नंतर पुन्हा हक्काच्या पैशासाठी पायपीट ही ठरलेलीच. आता कारभारात सुधारणा होत असली शेतकऱ्यांच्या बांधावरचे प्रश्न हे कायमच आहेत.
संबंधित बातम्या :
Latur Market : सोयाबीन-हरभरा आवकमध्ये सातत्य, आठवड्याच्या पहिल्या दिवशीचे दर काय ?
काय सांगता? ऐन हंगामात बाजार समितीचे व्यवहार ठप्प, शेतकऱ्यांनी नेमके करायचे काय?