अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे परराज्यात शेती घेण्याची नामुष्की, आता तर शेती सोडून देण्याची वेळ,नेमके कारण काय?

राज्यात कृषीपंपाला अनियमित विद्युत पुरवठा होत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणा सीमालगत शेतजमिन घेऊन जलस्त्रोत निर्माण केले आहेत. शिवाय तेलंगणा राज्यातील पाणी महाराष्ट्रातील शेतीला अशी परस्थिती असल्याचे तेलंगणा मंत्री टी राव यांनी सांगितले होते. आता यानंतर वाढत्या महागाईचा परिणाम थेट शेती व्यवसयावर होऊ लागला आहे. सध्या डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काळाच्या ओघात यंत्राच्या सहायाने शेती मशागतीची कामे होत आहेत.

अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे परराज्यात शेती घेण्याची नामुष्की, आता तर शेती सोडून देण्याची वेळ,नेमके कारण काय?
डिझेल दरवाढीचा परिणाम थेट शेती मशागतीवर झाला आहे. मशागतीसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्राच्या दरात वाढ झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 1:14 PM

नंदूरबार : राज्यात (Agricultural Pump) कृषीपंपाला अनियमित विद्युत पुरवठा होत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणा सीमालगत शेतजमिन घेऊन जलस्त्रोत निर्माण केले आहेत. शिवाय तेलंगणा राज्यातील पाणी महाराष्ट्रातील शेतीला अशी परस्थिती असल्याचे तेलंगणा मंत्री टी राव यांनी सांगितले होते. आता यानंतर वाढत्या महागाईचा परिणाम थेट शेती व्यवसयावर होऊ लागला आहे. सध्या (Diesel Rate) डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काळाच्या ओघात (Machin) यंत्राच्या सहायाने शेती मशागतीची कामे होत आहेत. मात्र, वाढत्या दरामुळे अल्पभूधारक शेतकरी शेती हे सोडून देण्याची भाषा करत आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ, शेती पध्दतीमध्ये बदल हे सर्व होत असले तरी बांधावरची स्थिती काही वेगळीच आहे. दरवर्षी ट्रॅक्टरच्या सहायाने होत असलेल्या मशागतीच्या दरात वाढ होत आहे.

शेती मशागतीचे असे आहेत दर

शेती मशागतीमध्ये प्रामुख्याने नांगरणी, मोगडणे, कोळपणी यासारखी कामे असतात. याशिवाय उत्पादनात वाढच होत नाही. पावसाळ्याला सुरवात होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे क्रमप्राप्त असते. सध्या ट्रक्टरच्या सहायाने नांगरण करायची म्हणले तर एकरी 2 हजार रुपये मोजावे लागत आहेत. तर कोळपणी -2000, रोटर-1500, कल्टीवेटर-700, थेशर मशीनवर धान्याची मळणी करणे यासाठी एका पोत्याला 200 ते 300 रुपये मोजावे लागत आहेत. मजूरांची मजुरी ही 500 रुपयांवर गेली आहे. अशा वाढत्या दरामुळे शेती ऐवजी दुसरा व्यवसाय किंवा दुसऱ्याच्यातच मजूरीने जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सुगीनंतर मशागतीची कामे

सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे खरीप हंगामाला अद्यापही तीन महिन्याचा अवधी आहे. पण दरम्यानच्या काळात शेती मशागतीची कामे करुन घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. मशागतीबरोबच शेती क्षेत्र चांगले तयार करणे, गाळ टाकणे यासाठी आता ट्रक्टरचाच वापर केला जात आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने हे महत्वाचे असते. बैलजोडीची जागा आता यंत्राने घेतलेली आहे.आता शेतीकामे उरकताच मशागतीच्या कामांना सुरवात होणार आहे.

शेती उत्पादनावरील खर्च वाढला

शेती व्यवसयातून मोबदला कमी आणि खर्च अधिक अशीच स्थिती झाली आहे. शेती मशागतीपासून पेरणी, मशागत, कीड नियंत्रणावरील खर्च आणि काढणीनंतर शेतीमालाची वाहतूक यानंतरही दराबाबत असलेली अनिश्चितता यामुळे शेती व्यवसयाच अडचणीत आला आहे. शिवाय डिझेलच्या वाढत्या दराचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन ठेपला आहे. त्यामुळेच शेती करावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे.

संबंधित बातम्या :

काय सांगता? ऐन हंगामात बाजार समितीचे व्यवहार ठप्प, शेतकऱ्यांनी नेमके करायचे काय?

Success Story | रुग्णसेवा करत काळ्या आईचीही मशागत, डॉक्टरांनी पिकवलेले खरबूज आता परदेशात निघाले, वाचा सविस्तर

 बीडच्या शेतकऱ्यानं करुन दाखवलं, अधिकच्या फायद्यासाठी Market च ताब्यात घेतलं

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.