AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story | रुग्णसेवा करत काळ्या आईचीही मशागत, डॉक्टरांनी पिकवलेले खरबूज आता परदेशात निघाले, वाचा सविस्तर

शासकीय नौकरदार असो की व्यवसायिक ज्याला शेतीची आवड आहे तो आपला छंद जोपासतोच. काळाच्या ओघात अनेकजण काळ्या मातीशी नाळ कायम ठेवतात. एवढेच नाही बदलत्या शेती पध्दतीनुसार पीक पध्दतीमध्ये बदल करुन इतर शेतकऱ्यांसमोर वेगळेच उदाहरण समोर ठेवतात. असाच काहीसा अनोखा उपक्रम जिल्ह्यातील वडाळी येथील पेशाने डॉक्टर असलेल्या नंदलाल चौधरी यांनी करुन दाखवला आहे.

Success Story | रुग्णसेवा करत काळ्या आईचीही मशागत, डॉक्टरांनी पिकवलेले खरबूज आता परदेशात निघाले, वाचा सविस्तर
नंदूरबार येथील डॉ. नंदलाल चौधरी यांनी खरबूजाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 11:37 AM

नंदुरबार : शासकीय नौकरदार असो की व्यवसायिक ज्याला शेतीची आवड आहे तो आपला छंद जोपासतोच. काळाच्या ओघात अनेकजण काळ्या मातीशी नाळ कायम ठेवतात. एवढेच नाही बदलत्या शेती पध्दतीनुसार (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करुन इतर शेतकऱ्यांसमोर वेगळेच उदाहरण समोर ठेवतात. असाच काहीसा अनोखा उपक्रम (Nandurbar District) जिल्ह्यातील वडाळी येथील पेशाने डॉक्टर असलेल्या नंदलाल चौधरी यांनी करुन दाखवला आहे. त्यांनी दोन एकरात शेड नेट मध्ये नॉनी सीड्स हनीड्यू आणि आलिया या दोन प्रकारच्या जातीच्या (Melon Farm) खरबूज ची लागवड केली होती.शेडनेट लागवड आणि कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या शिफारशींची त्यांनी अंमलबजावणी केली. लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य प्रकारे जोपसणा झाल्याने आता खरबूजाला 30 रुपये प्रतिकिलो असा दर मिळत आहे. यामुळे डॉक्टरांच्या उत्पादनात वाढ झाली असली तरी त्यापेक्षा जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग प्रेरणादायी ठरत आहे.त्यामुळे अनेकजण या पध्दतीने उत्पादन घेण्याचा प्रयत्न करु लागले आहेत.

अनोख्या प्रयोगाला योग्य नियोजनाची जोड

शेती व्यवसयात आता वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत. पण यामध्ये सातत्य ठेवले जात नसल्याने शेतकऱ्यांना यश मिळत नाही. पण येथील डॉ. नंदलाल यांनी दोन एकरामध्ये शेडनेट उभारले आहे. निसर्गाचा लहरीपणामुळे याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यातच त्यांनी नॉनी सीड्स हनीड्यू आणि आलिया या दोन प्रकारच्या जातीच्या खरबूज ची लागवड केली होती. नेटशेडमुळे मशागतीचा खर्च नसला तरी उत्पादन वाढीसाठी त्यांनी कृषितज्ञांचे सल्ला घेतला शिवाय कंपनीने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले.

जिल्हाभरातील शेतकऱ्यांनाही फायदा

खरबूज शेतीचा प्रयोग डॉक्टरांनी केला असला तरी याची चर्चा सबंध जिल्ह्यात आहे. अनेक शेतकरी हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत. तर अनेकांनी याची माहिती घेऊन अशाच पध्दतीने उत्पादन करण्याचा निर्धार केला आहे. डॉ. चौधरी यांचा देखील हाच उद्देश आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांन्या आत्याधुनिक शेतीची माहिती होत नाही. त्यामुळे या प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरावा हीच यामागची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

खरबूजाची निर्यात, डॉक्टरांना लाखोंमध्ये फायदा

खरबूजाचे अशा नवीन प्रकारचे उत्पादन जिल्ह्यात पहिल्यांदा घेतल जात आहे.यामुळे जिल्हाभरातून शेतकरी या ठिकाणी भेटी देत असल्याची माहिती डॉ. चौधरी यांनी दिली. तर नंदलाल चौधरी यांच्या शेतातील खरबूज एक्सपोर्ट केले जात आहेत. तसेच सुरत, मुंबई, अहमदाबाद मोठ्या शहरात व्यापारीविक्रीही पाठवतात. चौधरी यांना उत्पादन खर्च वजा जाता तीन लाखाचा फायदा झाला आहे. शेतकरी पूर्णवेळ देऊनही एवढे उत्पादन काढत नाही. त्यासाठी योग्य दिशा आणि मार्गदर्शन महत्वाचे आहे.

संबंधित बातम्या :

 बीडच्या शेतकऱ्यानं करुन दाखवलं, अधिकच्या फायद्यासाठी Market च ताब्यात घेतलं

Onion Rate : खरिपात उत्पादन घटलं अन् उन्हाळी हंगामात घटत्या दराने सर्वकाही हिसकावलं, कांदा नुकसानीचाच

Summer Season: कीड नियंत्रण हेच सीताफळाचे उत्पादन वाढीचे सूत्र, उन्हाळी बहरात योग्य व्यवस्थापन गरजेचे

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.