Summer Season: कीड नियंत्रण हेच सीताफळाचे उत्पादन वाढीचे सूत्र, उन्हाळी बहरात योग्य व्यवस्थापन गरजेचे

Summer Season: कीड नियंत्रण हेच सीताफळाचे उत्पादन वाढीचे सूत्र, उन्हाळी बहरात योग्य व्यवस्थापन गरजेचे
सीताफळ,

सीताफळाचा नैसर्गिक बहर हा खरा जून महिन्यात असतो पण पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळ्याच्या सुरवातीलाही बहर हा धरता येतो. या बहरातील काढणी ही जुलै-ऑगस्टच्या दरम्यान असते. त्यामुळे याला चांगला दरही मिळतो. सीताफळ हे हंगामी पीक असून पूर्वी केवळ जंगलामध्ये हे आढळून येत होते. उत्पादनाच्या दृष्टीने सीताफळाकडे पाहिले जात नव्हते पण आता योग्य पध्दतीने लागवड केल्यानंतर उत्पादनात तर वाढ होणारच आहे पण यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज आहे.

राजेंद्र खराडे

|

Mar 28, 2022 | 5:34 AM

लातूर : (Custard Apple) सीताफळाचा नैसर्गिक बहर हा खरा जून महिन्यात असतो पण पाण्याची उपलब्धता असल्यास (Summer Season) उन्हाळ्याच्या सुरवातीलाही बहर हा धरता येतो. या बहरातील काढणी ही जुलै-ऑगस्टच्या दरम्यान असते. त्यामुळे याला चांगला दरही मिळतो. सीताफळ हे हंगामी पीक असून पूर्वी केवळ जंगलामध्ये हे आढळून येत होते. (Production) उत्पादनाच्या दृष्टीने सीताफळाकडे पाहिले जात नव्हते पण आता योग्य पध्दतीने लागवड केल्यानंतर उत्पादनात तर वाढ होणारच आहे पण यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज आहे. छाटणी केल्यापासून ते फळपिकाची लागवड होईपर्यंत योग्य व्यवस्थापन केले तर उत्पादनात भर पडणार आहे.

उन्हाळी बहरातील सीताफळाला धोका कशाचा?

उन्हाळी बहरातील सीताफळाच्या सध्या छाटणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे सध्या या बागांना नवीन कोवळ्या फुटी आहेत.मात्र, या कोवळ्या फुटीवर मावा, फुलकिडे, तुडतुडे अशा रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ही किडे पाने, कोवळ्या फांद्या एवढेच नाही तर कोवळी फळे यातूनही रस शोषतात. यामुळे फुटींची व पानांची वाढ खुंटते शिवाय फळांचा आकार हा वेडावाकडा होतो. फळांची व्यवस्थित वाढ होत नाही परिणामी याचा उत्पादनावर परिणाम होतो.

किडीपासून कसे करावे संरक्षण

सीताफळाच्या बागेतील झाडांची छाटणी पूर्ण झाली की, या झाडांवर लागलीच एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करणे गरजेचे आहे. शिवाय झाडाच्या मुख्य खोडावर जमिनीपासून अडीच फूटावर 1 किलो चुना, 1 किलो मोरचूद प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून लावावी लागणार आहे. नवीन कोवळ्या फुटीवर मावा, फुलकिडे, तुततुडे यासारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामुळे प्रति लिटर पाण्यामध्ये डायमिथोएट 2 मिली, मॅन्कोझेब 2 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम याचे मिश्रण करुन फवारावे लागणार आहे.

छाटणी झालेल्या बागांमध्ये कोवळी फूट

उन्हाळ्याच्या तोंडावर सीताफळाची छाटणी पूर्ण झाली असेल. अशा बागांना कोवळी फूट निर्माण झाली असून नव पालवी फुटली आहे. येथून पुढे बागांची जोपासणा केली तर उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. यामुळे छाटणी झाल्यावरच अधिकचा धोका असतो त्या दरम्यान योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. शिवाय कीडीचा प्रादुर्भाव झाला तरी योग्य वेळी बंदोबस्त हाच त्यावरचा पर्याय आहे.

संबंधित बातम्या :

मधमाश्यांचे पालन, अल्पभूधारकांचे वाढेल उत्पादन, कृषी विज्ञान केंद्राकडूनही मदतीचा हात

Grape Damage : ज्याची भीती तेच झाले, व्यापाऱ्यांनीच द्राक्ष खरेदी थांबवली, निसर्गापुढे शेतकरी हताश

Photo Gallery : ऊसाची फडातच राख, बीडमध्ये हंगामात 500 एकरातील ऊस जळून खाक

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें