Grape Damage : ज्याची भीती तेच झाले, व्यापाऱ्यांनीच द्राक्ष खरेदी थांबवली, निसर्गापुढे शेतकरी हताश

नैसर्गिक संकटावर मात करीत उत्तर महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा जोपासल्या खऱ्या मात्र अंतिम टप्प्यात या शर्यतीमध्ये शेतकरीच हताश झाला आहे. द्राक्ष तोडणीच्या दरम्यान सांगली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम थेट द्राक्षावर झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे द्राक्षाला तडे गेले आहेत. ऊन-पावसाच्या खेळात द्राक्ष उत्पादकांचे मात्र न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

Grape Damage : ज्याची भीती तेच झाले, व्यापाऱ्यांनीच द्राक्ष खरेदी थांबवली, निसर्गापुढे शेतकरी हताश
अवकाळी आणि बदलत्या वातावरणामुळे सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागांचे नुकासान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 3:27 PM

सांगली : नैसर्गिक संकटावर मात करीत उत्तर महाराष्ट्र आणि (Sangali District) सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (Vineyard) द्राक्ष बागा जोपासल्या खऱ्या मात्र अंतिम टप्प्यात या शर्यतीमध्ये शेतकरीच हताश झाला आहे. द्राक्ष तोडणीच्या दरम्यान सांगली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम थेट (Grape) द्राक्षावर झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे द्राक्षाला तडे गेले आहेत. ऊन-पावसाच्या खेळात द्राक्ष उत्पादकांचे मात्र न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. याचा परिणाम उत्पादनावर तर होणारच आहे पण द्राक्ष तडकण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांनी थेट द्राक्ष खरेदीच बंद केली आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीपासून सुरु झालेले संकट आता संपल्यावरच मिटणार अशी अवस्था आहे.

दुष्काळात तेरावा

उत्पादनात घट झाल्यावर दर वाढणार हे बाजारपेठेचे सूत्र आहे. पण द्राक्षाच्या बाबतीत यंदा सर्वकाही उलटे होताना दिसत आहे. कारण यंदा उत्पादन घटले असताना हंगाम सुरु होताच द्राक्षाच्या दरात कमालीची घट झाली होती. वाढत्या उन्हाबरोबर द्राक्ष मागणीत वाढ होऊ लागली होती. मात्र, अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे. अजूनही शेकडो एकरावरील द्राक्ष हे बागेतच आहेत. विशेषत: तासगाव तालुक्यात अवकाळीने थैमान घातल्याने बागांमध्ये पाणी साचले होते.

थेट उत्पादनावर परिणाम

ज्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष तोडणी झाली आहे त्यांच्यासाठी हा पाऊस चांगलाच आहे. पण ज्या बागांमध्ये द्राक्ष अजूनही वेलीवरच आहेत त्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वी बागा जोपासण्यासाठी एकरी हजारो रुपये केवळ औषध फवारणीसाठी खर्ची केले आहेत. आता अंतिम टप्प्यात उत्पन्ना ऐवजी अशी निराशा होत असेल तर आगामी काळात द्राक्ष बागा ठेवल्या जातात की नाही अशी परस्थिती निर्माण होईल.

व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीच थांबवली

बदलत्या वातावरणामुळे द्राक्षांना तडे जाण्याची भीती असते. हेच गेल्या आठ दिवसांपासून सुरु आहे. अगोदर ऊन आणि त्यानंतर अवकाळी यामुळे द्राक्षामध्ये गोडवा उतरण्याऐवजी द्राक्षाला तडे जाण्याचीच अधिकची भीती आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. शिवाय दर कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांचा हा डाव असल्याचाही आरोप काही शेतकरी करीत आहेत. मात्र, बदलत्या वातावरणाचा परिणाम काय असतो याची प्रचिती द्राक्ष उत्पादकांच्या अवस्थेवरुन लक्षात येत आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : ऊसाची फडातच राख, बीडमध्ये हंगामात 500 एकरातील ऊस जळून खाक

निसर्गाचा लहरीपणा त्यात बाजारपेठेतील अस्थिरता, गव्हाची विक्री की साठवणूक, पुन्हा शेतकरी संभ्रमात

Weather Report : अवकाळीचे संकट टळले, आता वाढत्या ऊन्हाचा चटका, मार्चच्या अखेरीस होणार अंगाची लाहीलाही

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.