
आज पुण्यातील आळंदीमध्ये वारकऱ्यांचा मेळा जमला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा पार पडत आहेत. त्यासाठी आळंदी मध्ये राज्यभरातून लाखो भावी आळंदी मध्ये दाखल झाले आहेत.

पवित्र इंद्रायणीत स्नान करून वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी जात आहे. इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी गजबजून गेलाय. सगळीकडे माऊलींच्या नावाचा गजर पाहायला मिळतो आहे.

दुपारी 12 च्या सुमारास घंटानाद करत समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी करून हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्रभरातून आलेले भाविक उपस्थित असतील.

संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्री’चे दर्शन घेतले आहे. सगळेच वारकरी भक्तीरंगात न्हाऊन निघालेत.

ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आळंदी मध्ये पार पडतो आहे आणि या सोहळ्यानिमित्त अर्थातच अभंग सेवा दिली आहे. आघाडीची गायिका कोमल शेलार यांनी या अभंगामधून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्याच वर्णन केलं आहे,,