Pune Bitcoin scam | पुणे बिटकॉईन प्रकरण – पोलिसांच्या मदतीला नेमलेल्या तांत्रिक सल्लागारानेच हडपले 95 कोटींचे बिटकॉईन

| Updated on: Mar 26, 2022 | 11:00 AM

पोलिसांना तपासात अथवा इतर कामांसाठी सायबर तज्ज्ञ पुरवणारी केपीएमजी कंपनी आहे. 2018 मध्ये माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील हा या कंपनीत नोकरी करत होता. त्या कंपनीच्या वतीनेच त्याची बिटकॉईन फसवणूक प्रकरणात पोलिसांना मदत करण्यासाठी सायबर तज्ज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पण, या गुन्ह्यानंतर तो कंपनीचा भागीदार झाल्याचे आढळून आले आहे.

Pune Bitcoin scam | पुणे बिटकॉईन प्रकरण - पोलिसांच्या मदतीला नेमलेल्या तांत्रिक सल्लागारानेच हडपले 95 कोटींचे बिटकॉईन
पुणे बिटकॉइन घोटाळा
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे – देशातील पहिला बिटकॉईन आभासी चालनाचा घोटाळा(Pune Bitcoin scam) पुण्यात उघड झाला. या घोटाळ्याचा उलगडा करता असताना पोलिसांनी तांत्रिक साह्यासाठी (technical assistance)तज्ज्ञांची मदत घेतली होती. यासाठी पोलिसांनी सायबर तज्ज्ञ (Pune  cyber Police) म्हणून पंकज प्रकाश घोडे (रा. ताडीवाला रोड) आणि रवींद्र प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) यांची नेमणूक केली होती. मात्र या घोटाळ्याचा तपास करत असताना पोलिसांना तपासात मदत करणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यानेच तब्बल 75 कोटी रुपयांचे 240आरोपीकडील बिटकॉईन हडप केल्याचे समोर आले आहे. गुन्ह्यात पोलिसांनी मदत घेतलेल्या केपीएमजी कंपनीचा भागीदार व माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत 6 कोटी रूपयांचे बिटकॉईन व इतर चलन जप्त केले आहेत.बिटकॉईन च्या रक्कमेतून आरोपी पाटीलने आलिशान फ्लॅट व महागड्या गाड्याची खरेदी केली आहे.

असा झाला उलगडा

पुण्यात या घडलेल्या बिटकॉईनच्या घोटाळ्याच्या गुन्हयात तांत्रिक तपासाठी पोलिसांनी सायबर तज्ज्ञ म्हणून पंकज प्रकाश घोडे व रवींद्र प्रभाकर पाटील ( यांची नेमणूक केली होती. मात्र या दोघांनी ही तपास करत असताना बनावट खात्याचाआधार घेत घोटाळ्यातील बिटकॉईन आपल्या खात्यात वळते करून घेतले.एवढंच नव्हे तर पाटील याने गैरमार्गाने घेतलेले काही बिटकॉईन त्याची पत्नी व भाऊ यांच्या नावावर पाठविले. मात्र पोलिसांनी याचा संशय आल्यानंतर हा गुन्हा उघड झाला. त्यानंतर पोलीस तपासात पाटील याच्याकडे त्याने आतापर्यंत 240  बिटकॉईन घेतल्याचे आढळून आले आहे.

तपासासाठी नेमलेल्या कंपनीचे निघाले भागीदार

पोलिसांना तपासात अथवा इतर कामांसाठी सायबर तज्ज्ञ पुरवणारी केपीएमजी कंपनी आहे. 2018 मध्ये माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील हा या कंपनीत नोकरी करत होता. त्या कंपनीच्या वतीनेच त्याची बिटकॉईन फसवणूक प्रकरणात पोलिसांना मदत करण्यासाठी सायबर तज्ज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पण, या गुन्ह्यानंतर तो कंपनीचा भागीदार झाल्याचे आढळून आले आहे.

बायको व भावाच्या खात्यातही बिटकॉइन

आरोपी माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांने बेकायदेशीर रित्या कमावलेले बिटकॉईन पत्नी व भावाच्या खात्यात टाकले आहेत. ते बिटकॉईन जप्त करण्यासाठी त्याचे गोपणीय क्रमांक पत्नीला माहिती असल्याचे तो सांगत आहे. पण, त्याची पत्नी कांचन पाटील व भाऊ अमरनाथ पाटील यांनी न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी पंकड घोडे याने देखील काही बिटकॉईन घेतल्याचे पोलिसांना तपासात दिसून आले आहे. मात्र तो तपासात पोलिसांना सहकार्य करत नाही. त्याच्याकडे सापडलेल्या डेटांचे विश्लेषण सुरू आहे.