Pune Crime | पुण्यात बिटकॉइन घोटाळ्यातील आरोपी सायबर तज्ज्ञांना न्यायालयाचा दिलासा ; एमपीआयडी कलम केल रद्द

Pune Crime | पुण्यात बिटकॉइन घोटाळ्यातील आरोपी सायबर तज्ज्ञांना न्यायालयाचा दिलासा ; एमपीआयडी कलम केल रद्द
पुणे बिटकॉइन घोटाळा
Image Credit source: TV9

आरोपींवर पोलिसांनी लावलेल्या एमपीआयडी कायद्याला विरोध केला. नहार म्हणाले, कोणत्याही ठेवीदारांचे पैसे आरोपींनी घेतल्याचा प्रकार घडलेला नसून, तशा प्रकारचा कोणताही अर्ज पोलीस अथवा न्यायालयाकडे आलेला नाही. त्यामुळे आरोपींवरील एमपीआयडी कायदा रद्द करुन हे प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्यात यावा .

प्राजक्ता ढेकळे

|

Mar 20, 2022 | 1:22 PM

पुणे – देशातील पहिला बिटकॉइन फसवणूक घोटाळा(Bitcoin fraud scam) पुण्यात घडला. त्यानंतर या घोटाळ्यातील आरोपीला पोलिसांनी (Pune Police ) अटक केली. त्यानंतर या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तांत्रिक विश्लेषकाची मदत घेतली. मात्र तांत्रिक  विश्लेषक (Technical analyst)म्हणून काम करणाऱ्या पंकज घोडे आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनीच तपासाच्या नावाखाली आरोपीकडून जप्त करण्यात आलेले बिटकॉइन स्वतःच्या खात्यात वळते करून घेतले. हे चोरी उघ झाल्यानांत या दोघांना अटक करण्यात आली . अटक केल्यानंतर पोलिसांनी दोघांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध कायदा (एमपीआयडी) कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र बचाव पक्षाचे वकील ऍड. रोहन नहार आणि ऍड.अमोल डांगे यांनी आक्षेप घेत न्यायालयात अर्ज दाखल केला. यावर सुनावणी करत विशेष सत्र न्यायाधीश एस.एस. गोसावी यांच्या न्यायालयाने आरोपींवरील एमपीआयडी कायदा कलम रद्द केले.   हे प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे वर्ग केले आहे. दरम्यान, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी आरोपींना 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरु

पंकज घोडे आणि रविंद्र पाटील यांना 12 मार्च रोजी सायबर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने नुकतेच त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी बचाव पक्षाचे वकील रोहन नहार यांनी आरोपींवर पोलिसांनी लावलेल्या एमपीआयडी कायद्याला विरोध केला. नहार म्हणाले, कोणत्याही ठेवीदारांचे पैसे आरोपींनी घेतल्याचा प्रकार घडलेला नसून, तशा प्रकारचा कोणताही अर्ज पोलीस अथवा न्यायालयाकडे आलेला नाही. त्यामुळे आरोपींवरील एमपीआयडी कायदा रद्द करुन हे प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्यात यावा .

खाडाखोड करण्याचा प्रश्नच नाही

पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास झाला असून, केवळ तज्ज्ञ म्हणून पक्षकाराने काम केले आहे. बिटकॉइन आरोपींच्या खात्यातून पोलिसांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. त्याबाबतचे स्क्रीनशॉट त्या-त्यावेळी काढून देण्यात आले. त्यामुळे त्यात खाडाखोड करण्याचा प्रश्‍नच नाही. बिटकॉइनची चोरी पोलिसांनीच केली असून यासंर्दभात त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे.

Shivsena MIM Video : ‘एमआयएम’च्या प्रस्तावानं शिवसेनेची गोची? जलील म्हणतात, मग मी अस्पृश्य का? दानवे म्हणतात, मुस्लिमांचा द्वेष नाही!

शिकार करायची विसरला की काय वाघ? Viral झालेला Photo पाहून लोक बुचकळ्यात!

370 कलम काढल्यावरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, Sanjay Raut यांनी डिवचले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें