पुणेकरांनो, दोन दिवस चांदणी चौकातील वाहतूक बंद, पण तुमच्यासाठी चांगली बातमी

| Updated on: Apr 06, 2023 | 1:13 PM

पुणेकरांची प्रतिक्षा संपली आहे. आता पुणे शहरातील चांदणी चौकातील पूल सुरु करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. हा पूल सुरु होणार असल्यामुळे वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. पुणे शहरातील अनेक विकास कामांपैकी हे काम पूर्ण होत आहे.

पुणेकरांनो, दोन दिवस चांदणी चौकातील वाहतूक बंद, पण तुमच्यासाठी चांगली बातमी
Follow us on

अभिजित पोते, पुणे : पुणे शहारातील चांदणी चौक (Chandani chowk) पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम सुरु होते. नवीन पुलामुळे चांदणी चौकातून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. हा नवीन पूल कधी सुरु होणार याची प्रतिक्षा पुणेकर करत आहेत. आता पुणेकरांची ही प्रतिक्षा संपली आहे. चांदणी चौकातील पूल सुरु करण्यासंदर्भात घोषणा झाली आहे. यामुळे पुणेकरांना आणखी एक चांगली सुविधा मिळणार आहे. चांदणी चौकातील पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.

कधी होणार उद्घाटन

हे सुद्धा वाचा

पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन 1 मे रोजी होणार आहे. चांदणी चौकातील पुलाच्या कामाला वेग आला आहे. पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. 15 ते 20 एप्रिल दरम्यान गर्डर टाकण्याचे काम होणार सुरू होणार आहे. यामुळे चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. या कामांमुळे दोन दिवस चांदणी चौकातील वाहतूक बंद असणार आहे. पुणेकरांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

सर्व्हिस रोडचे काम पूर्ण


चांदणी चौकातून दुसरीकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे 10 एप्रिलला चांदणी चौकातील सर्व्हिस रोड सुरु होणार आहे. मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. याशिवाय बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या सेवा रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. १० एप्रिलपासून हे रस्ते वाहनचालकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे ‘एनएचएआय’कडून सांगण्यात आले.

शिंदेही अडकले होते वाहतूक कोंडीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील वर्षी साताऱ्याकडे निघाले होते. त्यावेळी पुण्यातील चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या फ्लायओव्हरच्या कामामुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी त्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता.

२ ऑक्टोंबर रोजी पाडला होता पूल


चांदणी चौकातील पूल २ ऑक्टोंबर रोजी पाडला होता. अगदी सहा सेंकदात हा पूल पाडण्यात आला होता. पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण 35 मिमी व्यासाचे 1 हजार 300 छिद्र पाडण्यात होते. मग 600 किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग वापर केला गेला होता. 1 हजार 350 डिटोनेटरचा उपयोगाने ब्लास्ट करण्यात आला. २ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान पूल पाडण्यात आला.

पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली होती. १६ एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, 30 टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, 2 अग्निशमन वाहन, 3 रुग्णवाहिका, 2 पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण 210 कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले होते.