चांदणी चौकातील पुलाच्या पाडकामाच्या तयारीला सुरुवात, पाहा व्हीडिओ…
पुण्याच्या चांदणी चौकातील पुलाच्या पाडकामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. हा पूल 2 ऑक्टोबरला मध्यरात्री 2 वाजता पाडला जाणार आहे.
अश्विनी सातव-डोके, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे: पुण्याच्या (Pune) चांदणी चौकातील (Chandni Chowk) पुलाच्या पाडकामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. हा पूल 2 ऑक्टोबरला मध्यरात्री 2 वाजता पाडला जाणार आहे. दिल्लीतील ट्विन टॉवर सारखंच हा पूलही पाडण्यात येईल. अवघ्या 5 सेकंदात स्फोटकांच्या सहाय्याने हा पूल पाडण्यात येईल. यासाठी 600 किलो स्फोटकांचा वापर केला जाणार आहे. 1300 होलमध्ये ही स्फोटकं भरण्यात येतील. या पाडकामाआधी 1 ऑक्टोबरला सध्याकाळपासून या मार्गावरची वाहतूक पू्र्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. आसपासचा 200 मीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यात येणार आहे.
Published on: Sep 28, 2022 10:24 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
