AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात क्लोरिन गॅस गळतीने एकच खळबळ, 24 जण रुग्णालयात दाखल

कोंढवा येथील गंगाधाम भागात मध्यरात्री एका बंद असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील गोदामात क्लोरिनच्या टाकीतून गॅस गळती होत असल्याची माहिती मिळाली होती, असं फायर ब्रिगेडचे अधिकारी सुनील नाइकनावारे यांनी सांगितलं.

पुण्यात क्लोरिन गॅस गळतीने एकच खळबळ, 24 जण रुग्णालयात दाखल
pune chlorine gas leak
| Updated on: Apr 30, 2026 | 12:12 PM
Share

पुण्याच्या कोंढवा भागात गुरुवारी क्लोरिन गॅसची गळती झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिन गॅस गळती झाली. या गॅसच्या संपर्कात आल्याने फायर ब्रिगेडच्या दोन जवानांसह 24 लोकांना श्वासोश्वास करण्यास त्रास होत होता. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोंढवा येथील गंगाधाम भागात मध्यरात्री एका बंद असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील गोदामात क्लोरिनच्या टाकीतून गॅस गळती होत असल्याची माहिती मिळाली होती, असं फायर ब्रिगेडचे अधिकारी सुनील नाइकनावारे यांनी सांगितलं.

माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या फायरब्रिगेडच्या टीमने सगळा परिसर रिकामी केला. गॅस गळती रोखण्यासाठी टाकीला पॅच लावला. या प्रक्रियेमध्ये फायर ब्रिगेडच्या दोन जवानांना गॅस गळतीची बाधा झाली. गॅसचा आसपासच्या परिसरात फैलाव झाल्याने 22 लोक आणि बचाव कार्यात गुंतलेल्या दोन जवानांना श्वासोश्वास करण्यास त्रास सुरु झाला. सर्वांना जवळच्या ससून जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार

रुग्णालयात दाखल असलेले 22 नागरिक आणि दोन जवनांच्या जिवीताला कोणताही धोका नाही अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. बंद पडलेल्या प्लांटमध्ये इतक्या खतरनाक गॅस टाकीच्या बाबतीत बेपर्वाई कशी याचा पोलीस आणि प्रशासन शोध घेत आहेत.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?