AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Cirme News | मित्राला देवदर्शनासाठी घेऊन गेला…महिन्यानंतर उलगडला सर्व प्रकार

Pune Cirme News | पुणे शहरातील धक्कादायक घटना तब्बल महिन्यानंतर उघड झाली आहे. मित्राला देवदर्शनासाठी घेऊन गेला. त्यानंतर तो परत आलाच नाही. पोलिसांच्या तपासानंतर हे प्रकरण समोर आले. आता पोलिसांनी या प्रकरणी...

Pune Cirme News | मित्राला देवदर्शनासाठी घेऊन गेला...महिन्यानंतर उलगडला सर्व प्रकार
| Updated on: Sep 29, 2023 | 10:04 AM
Share

रणजित जाधव, पुणे | 29 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील दोन मित्रांनी आपल्या दोघांनी एका मित्राबाबत केलेला प्रकार महिन्याभरानंतर उघड झाला आहे. देव दर्शनासाठी दोघांनी आपल्या मित्राला नेले. परंतु तो परत आला नाही. त्या मित्रांकडे कुटुंबियांकडून विचारणा होत होती. त्यांच्याकडून उत्तर मिळाले नाही. त्यानंतर ते दोघे नॉट रिचेबल झाले. शेवटी कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आता महिन्याभरानंतर या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी दोघ मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण

पुणे शहरातील रोहित नागवसे, गोरख फल्ले, सचिन यादव हे तिन मित्र होते. दोघांनी सचिनला निमगावला देवदर्शनासाठी जाऊ या, असे सांगत निमगावला नेले. 24 ऑगस्ट रोजी हे तिघे गेले. रोहित नागवसे आणि गोरख फल्ले यांनी सचिन यादव याला जंगलात मद्य पाजले. त्यानंतर सचिनच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. ही हत्या केल्यानंतर रोहित नागवसे आणि गोरख फल्ले फरार झाले. रोहित नागवसे हा मुंबईत तृतीयपंथी म्हणून वावरत पोलिसांची दिशाभूल करत होता तर दुसरा आरोपी गोरख फल्ले हा आपल्या बीड तालुक्यातील मूळ गावी जाऊन राहात होता.

महिन्याभरानंतर उघड झाला प्रकार

सचिन यादव बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानंतर रोहित नागवसे, गोरख फल्ले यांचा शोध घेतला. परंतु ते मिळत नव्हते. त्यानंतर तांत्रिक तपास करत अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर त्यांचे लोकेशन मिळाले. त्या आरोपींना अटक केली. पोलीस खाक्या दाखवत त्यांनी तपास केला. पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट एकने ही कारवाई केली.

का केला मित्राचा खून

रोहित नागवसे, गोरख फल्ले यांच्या डोक्यावर कर्ज झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी मित्राला लुबाडण्याचे त्यांनी ठरवले. त्यावेळी दारूच्या नशेत त्याची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक केली आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.