Pune Temperature : पुढच्या आठवड्यातलं तापमान 37 ते 39 अंशांपर्यंत राहणार, उन्हापासून दिलासा नाहीच

पुढील आठवड्यात शहराचे दिवसाचे तापमान (Temperature) 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे. रविवारी बहुतांशी ऊन होते. सायंकाळी डोंगरी भागासह काही ठिकाणी सोसाट्याचा वारा जाणवला.

Pune Temperature : पुढच्या आठवड्यातलं तापमान 37 ते 39 अंशांपर्यंत राहणार, उन्हापासून दिलासा नाहीच
उष्णता (प्रातिनिधिक छायाचित्र)
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 11, 2022 | 10:15 AM

पुणे : पुढील आठवड्यात शहराचे दिवसाचे तापमान (Temperature) 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे. रविवारी बहुतांशी ऊन होते. सायंकाळी डोंगरी भागासह काही ठिकाणी सोसाट्याचा वारा जाणवला. पुणेकरांना पुढील काही दिवस दिवसाच्या तापमानात वाढ, उष्णतेची लाट (Heat) जाणवू शकते. रविवारी दिवसाच्या तापमानात किरकोळ घसरण झाली, शिवाजीनगर आणि लोहगाव येथे अनुक्रमे 38.6 अंश सेल्सिअस आणि 38.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे एक अंशापेक्षा जास्त होते. गेल्या काही दिवसांपासून ते सामान्यपेक्षा 2-3 सेल्सिअसने जास्त होते, असे हवामान खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा आहे. आयएमडीच्या अधिकाऱ्याने सांगितले, की सध्या राज्याला लागून कोणतीही विशेष हवामान प्रणाली नाही.

काही जिल्ह्यांत पाऊस

दक्षिणेकडील भागात थोडीशी आर्द्रता आहे. परिणामी, कोकण विभागातील काही भागात आणि मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत पाऊस झाला आहे. 11 आणि 12 एप्रिल रोजी अगदी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

पुण्यात पावसाची शक्यता नाही

येत्या काही दिवसांत पुण्यात पावसाची शक्यता नाही. पुढील काही तास अंशतः ढगाळ वातावरण राहील, त्यानंतर आकाश निरभ्र होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

आणखी वाचा :

Aurangabad | “दोघांच्या संमतीने चार भिंतीच्या आत…” कीर्तनकाराच्या अश्लील व्हिडीओवर तृप्ती देसाईंचं परखड मत

Pune, IPL2022 : विराट कोहली, रोहित शर्माला भेटण्याचा मोह महागात, क्रिकेटप्रेमीवर गुन्हा दाखल

Pune : भावना दुखावण्याचं कारण पुढे करत पोलिसांनी रद्द केला पुण्यात होणारा नास्तिक मेळावा