पुणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील विरोधात आमदाराने फुंकले रणशिंग, असा निर्णय जाहीर

| Updated on: Aug 29, 2023 | 3:26 PM

Pune News Chandrakant Patil : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. अजित पवार यांच्यासोबत कोल्ड वॉर सुरु असताना आणखी एका प्रकरणामुळे ते अडचणीत आले आहेत.

पुणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील विरोधात आमदाराने फुंकले रणशिंग, असा निर्णय जाहीर
chandrakant patil
Follow us on

पुणे | 29 ऑगस्ट 2023 : पुणे शहराचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर अडचणी सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत आले. त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात बैठकांचा सपाटा लावला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील असताना अजित पवार बैठका घेऊ लागले. यामुळे अधिकारी अन् कार्यकर्ते गोंधळात आले. हा प्रश्न सोडवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. आता दुसराच प्रश्न त्यांचासमोर उभा राहिला आहे.

कोणत्या आमदाराने केला आरोप

पुण्यातील कसबा मतदार संघाचा निधी पर्वती मतदार संघाला देण्यात आला आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते आणि कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. कसबा मतदार संघाचा 10 कोटी रुपयांचा विकास निधी पर्वती मतदार संघाला दिल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांच्यावर धंगेकर यांनी केला आहे.

रवींद्र धंगेकर यांनी काय घेतली भूमिका

निधीची पळवापळवी झाल्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचा निधी पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून वगळण्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. कसबा मतदार संघाचा हक्काचा निधी परत द्या अन्यथा आंदोलन करु, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

काही पुरावे केले सादर

रवींद्र धंगेकर यांनी 100 विकास प्रकल्पांचा मंजूर झालेला निधी पर्वती मतदार संघात नेला असल्याचे काही पुरावे दिले. कसबा मतदार संघातील रस्ते, सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक शौचालयांची दुरुस्ती विसर्जन घाट उद्यान विकास आशा कामांना 20 डिसेंबर रोजी निधी मंजूर केला होता. परंतु तो मिळाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आधीच अडचण आता नवीन समस्या

चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांचा कोल्ड वॉर सुरु आहे. त्यामुळे अडचणीत आलेले चंद्रकांत पाटील यांनी भाजप श्रेष्ठी ऐवजी सरळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे प्रकरण नेल्याचे वृत्त आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री काही तोडगा काढणार का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.