इनोव्हा-पीक अपची समोरासमोर धडक; तीन जणांचा जागेवर मृत्यू, या घाटाजवळील घटना

| Updated on: Apr 04, 2023 | 10:31 AM

इनोव्हा-पीक अपची समोरासमोर धडक झाली. यात तीन जणांचा जागेवर मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाजवळ नगर-कल्याण महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

इनोव्हा-पीक अपची समोरासमोर धडक; तीन जणांचा जागेवर मृत्यू, या घाटाजवळील घटना
पणे - अपघातात पाच ठार
Follow us on

पुणे : इनोव्हा आणि पीकअप टेम्पो (Innova-Pick Up head-on collision) या गाड्यांचा समोरासमोर अपघात झाला. रात्रीच्या सुमारास माळशेज घाट परिसरात असणाऱ्या वाटखळ गावाजवळ पीकअप टेम्पो आणि इनोव्हा गाडीची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भयानक होती की, इन्व्होवा गाडीत असणाऱ्या सहा पैकी तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर पीकअप टेम्पो चालक यात थोडक्यात बचावला आहे. इनोव्हा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे समोरून येणाऱ्या पीकअपला तिने जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला.

असा झाला अपघात

जुन्नर तालुक्यात हा भीषण अपघात घडला. नगर-कल्याण महामार्गावरील वाटखडे या गावाजवळ हा अपघात झाला. यात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. इनोव्हा एमएच ०५-एएच ६३३७ मुंबईच्या दिशेने जात होती. पीक अप एमएच १४ जेडी ४०७४ कल्याणहून येत होती. या दोन्ही गाड्यांमध्ये हा अपघात झाला. इनोव्हा गाडी अक्षरशहा चक्काचूर झाली.

इनोव्हा गाडी चक्काचूर

इनोव्हा गाडी चक्काचूर झाली आहे. इनोव्हा गाडी समोरून पूर्णपणे चुरडली गेली. रात्री अपघात झाल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छदेनासाठी रुग्णालयात पाठवले. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती.

चालक सुदैवाने बचावला

या अपघातात सहा पैकी तीन जणांचा मृत्यू झाला. यातून चालक सुदैवाने बचावला आहे. जखमी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आता मृतकांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.  रात्रीची वेळ असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण गेले. त्यामुळे अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यास पोलिसांना मदत केली. मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. पुढील तपास करीत आहेत.