Pune crime | पुणे कात्रज सिलेंडर स्फोट प्रकरण ; चौघांविरुद्ध गुन्हे दाखल; एक अटकेत

| Updated on: Mar 30, 2022 | 6:44 PM

आरोपी सागर पाटील यांच्या जागेत बेकायदेशीर रित्या हा व्यवसाय सुरु होता. विनापरवाना सिलिंडर्सचा साठा करण्यात आला होता बेकायदा गॅस फिलिंगचा उद्योग करत असल्याने ही दुर्घटना घडली आहे. आजूबाजूच्या घरांना आगी लागल्या. संपूर्ण कात्रज परिसर या स्फोटांनी हादरला. 

Pune crime | पुणे कात्रज सिलेंडर स्फोट प्रकरण ; चौघांविरुद्ध गुन्हे दाखल; एक अटकेत
Pune Katraj cylinder explosion
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे – शहरातील कात्रज परिसरात (Katraj  area) काल (मंगळवारी) एकापाठोपाठ अश्या 25 सिलिंडर्सचे स्फोट (Explosion of cylinders)झाल्याची घटना घडली. या सिलेंडर स्फोट प्रकरणी पोलिसांनी चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे व एकाला अटक करण्यात आली आहे. कात्रज पोलिसांनी(Police) सिलेंडर व्यावसायिक सागर पाटील च्यासह आणखी दोघांवर भादंवि (भारतीय दंड संहिता विधान) कलम 436, 308 आणि 285 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपी सागर पाटील यांच्या जागेत बेकायदेशीर रित्या हा व्यवसाय सुरु होता. विनापरवाना सिलिंडर्सचा साठा करण्यात आला होता बेकायदा गॅस फिलिंगचा उद्योग करत असल्याने ही दुर्घटना घडली आहे. आजूबाजूच्या घरांना आगी लागल्या. संपूर्ण कात्रज परिसर या स्फोटांनी हादरला.

स्फोटाने परिसर हादरला

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार सागर संदीप पाटील ( वय 26), सोनू मांगडे, संपत सावंत आणि दत्तात्रय काळे ( सर्व रा. कात्रज ) ही संशयित आरोपींची नावे आहेत. काळे हा जागामालक असून तेथे पाटील याने गॅस रिफिलिंगचा बेकायदा उद्योग सुरू केला होता. त्यासाठी त्याने तेथे 100 हुन अधिक सिलिंडर्स आणून ठेवले होते. तेथे मोठ्या सिलिंडर्समधील गॅस छोट्या टाक्यांमध्ये भरण्याचे काम सुरू असतानाच वायू गळती होऊन तेथे एकापाठोपाठ 25  सिलिंडर्सचे स्फोट झाले. आजूबाजूच्या घरांना आगी लागल्या. संपूर्ण कात्रज परिसर या स्फोटांनी हादरला. त्यामध्ये संपूर्ण गोडावून भस्मसात झाले; तसेच तेथील चारचाकी दोन वाहनेही आगीत जाळून खाक झाली.

जीवित हानी नाही

कात्रजमध्ये घडलेल्या सिलिंडरच्या स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. कला घटनेची माहिती मिळताच अग्नीशामक दलाने तातडीने घटना स्थळावर धाव घेत आग विझवली. मात्र या घटनेमुळे नागरिकांच्या मनात मोठी भीतीनिर्माण झाली आहे. या घटनेमुळे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पहिल्या दहा महिन्यातच देशातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीत 25 टक्क्यांनी वाढ; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार

150 महिलांना प्रत्येकी 5 हजारांची मदत, लर्निग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्डचा उपक्रम काय?

IAS Pradeep Gawande : आयएएस झाल्यानंतरही जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही तेवढी आता, लातूरचे प्रदीप गावंडे लग्नामुळे एका रात्री स्टार